शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Gold Silver Rates Today : सोन्या-चांदीच्या दरात अचानक मोठी घसरण? पटापट चेक करा आजचे दर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 1:13 PM

1 / 7
Gold Silver Price 24 May: सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात झालेल्या मोठ्या उसळीनंतर आता घसरण सुरू झाली आहे. आज 24 मे रोजी सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव 874 रुपयांनी घसरून 71952 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. गेल्या चार दिवसांत सोन्याच्या दरात 2270 रुपयांची घसरण झाली आहे.
2 / 7
चांदीचा भाव मात्र 358 रुपयांनी घसरून 89697 रुपये प्रति किलो ग्रॅम झालाय. गेल्या तीन दिवसांत चांदीत 3397 रुपयांची घसरण झाली आहे. 22 मे रोजी चांदीनं 93094 रुपये प्रति किलोचा उच्चांक गाठला होता. दुसरीकडे 21 मे रोजी सोन्यानं 74222 रुपयांचा उच्चांक गाठला होता.
3 / 7
आयबीजेएच्या ताज्या दरानुसार, शुक्रवारी, 24 मे रोजी 23 कॅरेट सोन्याचा भाव 870 रुपयांनी घसरून 71664 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. जीएसटीसह 23 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 73,813 रुपये होईल. इतर शुल्कांसह तो 81195 रुपयांच्या जवळपास असेल.
4 / 7
तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 801 रुपयांनी कमी होऊन 65908 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. जीएसटी, ज्वेलरी मेकिंग चार्ज आणि नफा जोडल्यानंतर 22 कॅरेटची किंमतही 74673 रुपयांवर पोहोचली आहे.
5 / 7
तर 18 कॅरेट सोन्याचा भाव ही 656 रुपयांनी कमी होऊन 53964 रुपये झाला आहे. तर, जीएसटी, ज्वेलरी मेकिंग चार्ज आणि 18 कॅरेट सोन्याचा नफा जोडल्यानंतर तो 61141 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव जीएसटीसह 74110 रुपये प्रति 10 ग्रॅम असेल.
6 / 7
सोन्या-चांदीच्या दरात घसरण का झाली - भूराजकीय तणाव कमी होत आहे, अमेरिकेच्या व्याजदरात कपात जूनपासून पुढे ढकलली जाऊ शकते, रिस्क रिवॉर्ड रेश्यो अनुकूल नाही, फिजिकल डिमांडमध्ये अडथळा, जुनं सोनं किंवा बाजारातील सोन्याचा पुनर्वापर, टेक्निकल प्रॉफिट बुकिंग.
7 / 7
सोन्या-चांदीचे दर आयबीजेएद्वारे जारी केले जातात. यावर जीएसटी आणि ज्वेलरी मेकिंग चार्जेसचा समावेश नसतो. तुमच्या शहरात सोन्या-चांदीच्या दरात तफावत आढळून येऊ शकते.
टॅग्स :GoldसोनंSilverचांदी