The mystery behind the horrible murder of a woman has been solved, the shocking truth revealed by the police | महिलेच्या भयानक हत्येमागचं गूढ उकललं, पोलिसांनी समोर आणलं धक्कादायक सत्य

महिलेच्या भयानक हत्येमागचं गूढ उकललं, पोलिसांनी समोर आणलं धक्कादायक सत्य

ठळक मुद्देपोलिसांनी आरोपी नराधमाला अटक केली असून पुढील तपास करत आहे. या घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती.पांढऱ्या रंगाच्या टेम्पोमध्ये एका महिलेची गळा चिरून हत्या करून गोणीमध्ये भरलेला मृतदेह रविवारी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास सापडल्याने एकच खळबळ उडाली होती.

नालासोपारा - 32 वर्षीय महिलेच्या हत्येचे गूढ अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या वसई टीमच्या पोलिसांनी उकललं आहे. आरोपीने क्षुल्लक कारणावरून महिलेचा गळा दाबून नंतर चाकूने वार करत ती मयत झाल्यावर तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी समोर आणली होती. पोलिसांनी आरोपी नराधमाला अटक केली असून पुढील तपास करत आहे. या घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती.

नालासोपारा पूर्वेकडील संयुक्त नगर रोडवरील झालावड पार्क समोरील पांढऱ्या रंगाच्या टेम्पोमध्ये एका महिलेची गळा चिरून हत्या करून गोणीमध्ये भरलेला मृतदेह रविवारी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. सदर महिला बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या पतीने शनिवारी केल्याने तिची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले होते. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून ही हत्या नेमकी कोणी व का केली याचा तपास सुरू केला होता. प्लास्टिकमध्ये गुंडाळलेल्या महिलेच्या हत्येमागचं गूढ स्थानिक गुन्हे शाखेच्या वसईच्या पथकाने उकलले आहे. घटनास्थळी कोणताही पुरावा नसताना आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

नालासोपारा पुर्व चंदन नाका, झालावड पार्कसमोर मयत नगीना आशिष यादव (32) या 27 जूनला बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या पतीने तुळींज पोलीस ठाण्यात केली होती. 26 जूनला नगीना या काही सामान आणण्यासाठी बाहेर गेल्या होत्या त्या प्रेम नॉव्हेल्टी स्टेशनरी कॉस्मेटीक गिफ्टच्या दुकानात शिवा नागाराम चौधरी (30) याच्याशी किंमतीवरून बाचाबाची झाली. त्याच वेळी शिवा याने तिच्या केसांना धरून दुकानाच्या आतील रूममध्ये नेवून तिचा गळा दाबून चाकूने वार केला आणि नंतर तिच्यावर अत्याचार केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने तिचं प्रेत एका प्लास्टिकच्या गोणीत गुंडाळून रात्री 2 ते 3 च्या सुमारास खांद्यावर घेवून चंदन नाका इथल्या एका बंद असलेल्या महिंद्रा पिकप टेम्पो क्र, एम.एच. 04 डी.एस. 0090 या मध्ये टाकण्यात आला होता.


 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

अज्ञात महिलेचा मृतदेह टेम्पोत आढळल्याने खळबळ 

 

मातृत्वाला काळिमा! अंगावर एकही कपडा नाही, अंगाला रक्त लागलेलं अन् नाळसह आढळले एक दिवसाचे बाळ

 

लज्जास्पद! पोलीस अधिकाऱ्याने महिलेसमोर केले हस्तमैथुन, घटनेचा व्हिडीओ व्हायरल 

 

Sushant Singh Rajput Suicide : तपासाला वेग, आत्महत्येवेळी घरात सिद्धार्थ देखील होता उपस्थित

 

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी संजय लीला भन्साळींना 'समन्स', बॉलिवूड विश्वात खळबळ

 

अ‍ॅसिडने जळालेले होते चेहरे, प्रेमीयुगुलाचे झाडाला लटकलेले आढळले कुजलेले मृतदेह

 

कोरोना रुग्णाकडून अतिरिक्त पैसे आकारल्याने मुंबईतील नामांकित रुग्णालयाविरोधात पालिकेची तक्रार  

 

धक्कादायक! बलात्कारास विरोध करणाऱ्या अल्पवयीन मुलीस जिवंत जाळले, मदतीसाठी ढसाढसा रडत होती

 

पतीसोबतच्या भांडणानंतर पत्नीने ३ मुलांसह घेतली ट्रेनसमोर उडी, थोडक्यात वाचलं १ वर्षाचं बाळ 

Web Title: The mystery behind the horrible murder of a woman has been solved, the shocking truth revealed by the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.