शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील तरुणाची पाकीटमाराकडून हत्या, विरारमधील घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2021 08:43 IST

Crime News: मुंबईत राहणारा ३० वर्षीय तरुण, त्याची पत्नी व सासू विरारमध्ये नातेवाइकांकडे आले असता बुधवारी रात्री घरी जाण्यासाठी विरार रेल्वे स्थानकात ट्रेनचे तिकीट काढताना चोरट्याने त्याचे पाकीट चोरले. तरुणाने चोरट्याचा पाठलाग करून स्टेशनजवळील श्रेया हॉटेलच्या गल्लीत त्याला पकडल्यावर तरुणात व चोरट्यात झटापट झाली.

नालासोपारा : मुंबईत राहणारा ३० वर्षीय तरुण, त्याची पत्नी व सासू विरारमध्ये नातेवाइकांकडे आले असता बुधवारी रात्री घरी जाण्यासाठी विरार रेल्वे स्थानकात ट्रेनचे तिकीट काढताना चोरट्याने त्याचे पाकीट चोरले. तरुणाने चोरट्याचा पाठलाग करून स्टेशनजवळील श्रेया हॉटेलच्या गल्लीत त्याला पकडल्यावर तरुणात व चोरट्यात झटापट झाली. या झटापटीत चोरट्याने धारदार चाकू तरुणाच्या पोटात खुपसला. जखमी तरुणाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. विरार पोलिसांनी जबरी चोरी, हत्येचा गुन्हा दाखल केला असून, तपास करत आहेत.मुंबईच्या विलेपार्ले येथे राहणारा हर्षल वैद्य (३०), त्याची पत्नी प्रियंका आणि सासू प्रभावती मानकामे (६०) हे तिघे बुधवारी विरार येथे राहणाऱ्या नातेवाइकांकडे नवरात्रीनिमित्ताने आले होते. बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास मुंबई येथील घरी जाण्यासाठी विरार रेल्वे स्थानकाजवळील पश्चिमेकडील तिकीट खिडकीवर तिकीट काढण्यासाठी आले. त्याचवेळी एका चोरट्याने हर्षलचे पाकीट चोरून रेल्वे स्थानकाच्या बाहेर पळू लागला. हर्षल व इतर लोकांनी चोरट्याचा पाठलाग केला. स्टेशनजवळील श्रेया हॉटेलच्या शेजारील अरुंद बोळात अंधारात लपून बसलेल्या पाकीटचोराला बाहेर येण्यास सांगितले. पण, तो बाहेर न आल्याने हर्षल त्याला पकडण्यासाठी बोळात घुसला. यावेळी चोर आणि हर्षल यांच्यात झटापट झाली. याच झटापटीत चोरट्याने त्याच्याजवळील धारदार चाकू हर्षलच्या पोटात खुपसून गंभीर दुखापत केली. यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, त्याची स्थिती नाजूक असल्याने मुंबईच्या शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. पण त्याचा तिथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.  

या प्रकरणी जबरी चोरी व हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी प्रदीप त्रिपाठी याला अटक करण्यात आली आहे. हा सराईत पाकीटमार असून रेल्वेमध्ये या आरोपीवर पाकीटमारीचे गुन्हे दाखल आहेत.- सुरेश वराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विरार पोलीस ठाणे

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीVasai Virarवसई विरार