Mumbai: NCB summons Dawood Ibrahim's aide Raziq Chikna | Raziq Chikna : गँगस्टर राझिक चिकनाला एनसीबीकडून समन्स

Raziq Chikna : गँगस्टर राझिक चिकनाला एनसीबीकडून समन्स

मुंबई : अमली पदार्थ नियंत्रक कक्षाने (एनसीबी) गँगस्टर राझिक चिकनाला चौकशीला हजर रहाण्याबाबत समन्स जारी केले. मादक पदार्थची तस्करी करण्यात त्याचा सहभाग असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
राझिक हा अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक असून, त्याच्या टोळीकडून अमली पदार्थाच्या तस्करीचा व्यवहार पाहत असल्याचे सांगितले जाते. एनसीबीने गेल्या आठवड्यात राझिकचा भाऊ दानिश चिकनाला गेल्या आठवड्यात राजस्थानमधून अटक झाली. सध्या तो एनसीबीच्या ताब्यात आहे. तो दाऊद टोळीचा मोहरक्या व भाऊ राझिकच्या सूचनेनुसार डोगरीत ड्रग्जचा कारखाना चालवित होता. त्याच्या गाडीतून  मादक द्रव्यांचा साठा जप्त केल आहे.

Web Title: Mumbai: NCB summons Dawood Ibrahim's aide Raziq Chikna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.