शहरं
Join us  
Trending Stories
1
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
2
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
3
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
4
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
5
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
6
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
7
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
8
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
9
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
10
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
11
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
12
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
13
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
14
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
15
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
16
नालेसफाईच्या ठेक्यात १५ टक्के लाचेची मागणी; एपीएमसी उपसचिव अडकला एसीबीच्या जाळ्यात
17
महाविद्यालयात किती रिक्त जागा; आज कळणार , अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा २१ मेपासून 
18
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण; याचिकेवर सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार
19
‘डीसीजीए’ विमान इंधन स्वीचची  ‘बोईंग’मध्ये करणार चौकशी; पथक लवकरच अमेरिकेत जाऊन तपास करणार
20
भटके कुत्रे : सुप्रीम कोर्टाने आपली जबाबदारी झटकली; मनेका गांधींचा आरोप, पूर्वीचे आदेशच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतून तडीपार केलेला गुंड पुन्हा जेरबंद; श्रीनगर पोलिसांची कारवाई

By जितेंद्र कालेकर | Updated: January 13, 2023 19:56 IST

दिनकर हा  मनाई आदेशाचे उल्लंघन करून किसननगर भागात मोकाट फिरत असल्याची माहिती श्रीनगर पोलिसांना मिळाली.

ठाणे -  मुंबई, ठाण्यासह पाच जिल्हयांमधून हद्दपार केलेला दशरथ दिनकर हराळे उर्फ साई (२६, रा. शिवाजीनगर, वागळे इस्टेट, ठाणे) याला चाकूसह श्रीनगर पोलिसांनी पुन्हा जेरबंद केले आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी शुक्रवारी दिली. 

वागळे इस्टेट भागात हाणामारीसह दहशत पसरविणारा गुंड दिनकर साई याला वागळे इस्टेट परिमंडळाचे तत्कालीन पोलिस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांनी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगड या पाच  जिल्हयातून दोन वर्षांसाठी  हद्दपार करण्याचे आदेश ४ जानेवारी २०२३ रोजी दिले होते. तरीही दिनकर हा  मनाई आदेशाचे उल्लंघन करून किसननगर भागात मोकाट फिरत असल्याची माहिती श्रीनगर पोलिसांना मिळाली. त्याच आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनिल शिंदे यांच्या पथकाने १२ जानेवारी रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास सापळा रचून किसननगर क्रमांक तीनच्या भागातून दशरथला अटक केली. त्याच्या अंगझडतीत एक लोखंडी सुराही जप्त केला आहे. त्याच्याविरुध्द भारतीय हत्यार कायदा तसेच १४२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक प्रमोद पाटील हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.