लग्नाच्या एक दिवसआधी होणाऱ्या पत्नीच्या प्रियकराला भेटला, त्याच्यावर गोळी झाडली; नंतर केलं लग्न....

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 12:40 PM2021-07-22T12:40:15+5:302021-07-22T12:40:36+5:30

नवरीच्या प्रियकरावर गोळी नवरदेवाने झाडली होती. पोलिसांनी अजून नवरदेवाला अटक केली नाही. प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

MP Crime News : Man shoot bullet on another for his bride love affair in sheopur | लग्नाच्या एक दिवसआधी होणाऱ्या पत्नीच्या प्रियकराला भेटला, त्याच्यावर गोळी झाडली; नंतर केलं लग्न....

लग्नाच्या एक दिवसआधी होणाऱ्या पत्नीच्या प्रियकराला भेटला, त्याच्यावर गोळी झाडली; नंतर केलं लग्न....

Next

मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh Crime News) श्योपुर जिल्ह्यातून एक अजब घटना समोर आली आहे. इथे एकीकडे तरूणीचा प्रियकर गोळी (Gun Fire) लागल्याने हॉस्पिटलमद्ये उपचार घेत होता तर दुसरीकडे तरूणी नवरदेवासोबत सप्तपदी घेत होती. नवरीच्या प्रियकरावर गोळी नवरदेवाने (Groom fired gun on bride's lover) झाडली होती. पोलिसांनी अजून नवरदेवाला अटक केली नाही. प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना सोमवारी रात्री उशीराची आहे. जिल्ह्यातील पांडोल गावात एका तरूणीचं लग्न पवन नावाच्या तरूणासोबत ठरलं होतं. मंगळवारी दोघांचं लग्न होणार होतं. यादरम्यान पीडित कुलवीर उर्फ जसवीर सिंहने पवनला त्याच्या होणाऱ्या पत्नीच्या अफेअरबाबत सांगितलं. तो म्हणाला की, ती माझी आहे. (हे पण वाचा : 'माझ्यावर प्रेम केले नाहीस तर मी रेल्वेखाली जीव देईल', असे घाबरवून १७ वर्षीय मुलीला प्रेम करण्यास भाग पाडले)

यानंतर पवनने सोमवारी रात्री उशीरा कुलवीरला बोलवलं आणि समजावून सांगितलं. तो कुलवीरला म्हणजे होणाऱ्या पत्नीच्या बॉयफ्रेन्डला म्हणाला की, तू माझ्या होणाऱ्या पत्नीचा पिच्छा सोड. आणि मंगळवारी होणाऱ्या लग्नात काही अडथळा आणू नको.

यानंतर कुलवीर पवनला म्हणाला की, तिचं त्याच्यावर प्रेम आहे आणि हे लग्न जबरदस्ती लावलं जात आहे. हे ऐकताच पवनने बंदूक काढली आणि कुलवीरवर गोळी झाडली. गोळी कंबरेला लागून आरपार गेली. घटनेवेळी पवनसोबत त्याच्या भाऊ दिलखुश आणि गोकुळ होते. पोलिसांनी पीडित तरूणाच्या जबाबावरून तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (हे पण वाचा : पतीने प्रियसीच्या साथीने केला पत्नीचा विनयभंग! वेळोवेळी दिला शारीरिक व मानसिक त्रास)

या घटनेनंतर पोलिसांनी आरोपींना अटक केलेली नाही. मंगळवारी आरोपी आणि तरूणीचं लग्न झालं. यादरम्यान तरूणावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. याप्रकरणी एसपी प्रेमलाल कुर्वे म्हणाले की, गोळी जुन्या वादातून मारली गेली आहे. प्रकरणाची चौकशी केली जात आहे. नियमानुसार कारवाई केली जाईल.
 

Web Title: MP Crime News : Man shoot bullet on another for his bride love affair in sheopur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app