पतीने प्रियसीच्या साथीने केला पत्नीचा विनयभंग! वेळोवेळी दिला शारीरिक व मानसिक त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 06:19 PM2021-07-21T18:19:23+5:302021-07-21T18:19:33+5:30

प्रियसीने पत्नीचे फोटो आपल्या इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅप अकाउंटवर ठेऊन अश्लील भाषेत मेसेज केले होते.

Husband molested wife with girlfriend! Physical and mental distress from time to time | पतीने प्रियसीच्या साथीने केला पत्नीचा विनयभंग! वेळोवेळी दिला शारीरिक व मानसिक त्रास

पतीने प्रियसीच्या साथीने केला पत्नीचा विनयभंग! वेळोवेळी दिला शारीरिक व मानसिक त्रास

Next

पिंपरी : प्रियसीच्या मदतीने पत्नीला शारीरिक व मानसिक त्रास देत पत्नीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार निगडी येथे घडला आहे. तसेच पत्नीचे फोटो प्रियसीच्या इन्स्टाग्राम व व्हॉट्सअ‍ॅप अकाउंटवर टाकल्याने पती व त्याच्या प्रियसीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २०१९ ते २०२१ या कालावधीत हा घडला आहे. या प्रकरणी पत्नीने मंगळवारी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती व पत्नी यांचे २०१४ मध्ये लग्न झाले असून त्यांना सहा वर्षांची मुलगी आहे. मात्र, गेल्या काही काळापासून पतीचे एका महिलेसोबत प्रेमसंबंध आहेत. त्यामुळे ते पत्नीसोबत राहत नाहीत. मात्र, पती व त्याची प्रियसी ही पत्नीला वेळोवेळी मानसिक व शारीरिक त्रास देत होते. तसेच प्रियसीने पत्नीचे फोटो आपल्या इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅप अकाउंटवर ठेऊन अश्लील भाषेत मेसेज केले होते. असे फिर्यादीत नमूद केले असल्याने दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Husband molested wife with girlfriend! Physical and mental distress from time to time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app