उत्तर प्रदेशच्या उन्नावमध्ये एका महिलेने आपल्याच पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे तिने हे कृत्य आपल्या मुलीच्या मदतीने केलं. पती-पत्नीमधील वादाचं कारण म्हणजे दोघांचं अनैतिक वर्तन. पत्नी आणि मुलीचं वागणं पतीला आवडत नव्हतं आणि तो त्यांना नेहमी टोकून सांगायचा, यामुळे घरात नेहमीच वाद होत असत. या दोघी मायलेकींना पोलिसांनी अटक केली असून, पुढील कारवाई सुरू आहे.
हे प्रकरण अजगैन कोतवाली भागातील सिंघनापूर गावात घडलं आहे. इथे राहणारे ४६ वर्षीय राजेश कुमार यांचा मृतदेह गुरुवारी पहाटे पाच वाजता घरात जिन्याजवळ रक्ताच्या थारोळ्यात आढळला. मृताची पत्नी कामिनीने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तपास केला असता, कामिनीने राजेश यांचा दारूच्या नशेत जिन्यावरून पडून मृत्यू झाल्याचं सांगितलं. पण पोलिसांना संशय आला. कारण राजेश यांच्या गळ्यावर आणि डोळ्यांवर जखमा होत्या. एवढंच नाही तर, नातेवाईकांनीही कामिनीवरच संशय व्यक्त केला.
मायलेकींना अटकयानंतर पोलिसांनी तातडीने मायलेकींना ताब्यात घेतलं. मृताचे मावस भाऊ संतोष बाबू यांनी पोलिसांना सांगितलं की, राजेशला त्याची पत्नी आणि मुलगी यांचं वर्तन आवडत नव्हतं. याच कारणामुळे तो त्यांना विरोध करत होता. त्याची पत्नी कामिनीला त्याच्याशी फारसं देणंघेणं नव्हतं, ती फक्त पैशांसाठी त्याच्यासोबत होती. कामिनी राजेश यांच्यावर तिची जमीन विकल्याचा आरोपही करत होती. मुलगी काजलसोबत मिळून कामिनी रोज राजेशला मारहाण करत होती. त्यांच्या मुलानेही वडील त्यांच्याच आई आणि बहिणीमुळे गेल्याचा संशय व्यक्त केला होता.
सीओ अरविंद चौरसिया यांनी सांगितलं की, शवविच्छेदन अहवालात गळा दाबून हत्या झाल्याची पुष्टी झाली आहे. त्यानंतर आई आणि मुलीवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी सांगितलं की, मृतदेहाची अंत्यसंस्काराची प्रक्रिया अजून झालेली नाही, ती शुक्रवारी पूर्ण केली जाईल.
२९ जुलैलाही केली होती मारहाणसंतोष बाबू यांनी सांगितलं की, राजेश कुमार मुंबईत खासगी नोकरी करत होते. दीड महिन्यांपूर्वी ते घरी आले होते. पत्नी आणि मुलीचं वर्तन योग्य नसल्याचं पाहून त्यांनी विरोध सुरू केला. यामुळे २९ जुलैच्या रात्री पत्नी आणि मुलीने त्यांना मारहाण केली होती. त्यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना मलिहाबाद येथे नेऊन त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. नंतर त्यांनी घरी परत जाण्याची इच्छा व्यक्त केल्यावर त्यांना घरी पाठवण्यात आलं.
चार मुलांचे वडील होते राजेशमृत राजेश यांचा मोठा मुलगा आशीष यालाही वडील आणि आई-बहिणीचे वागणे आवडत नव्हते. सहा दिवसांपूर्वी त्याने मी मुंबईला जातो सांगून वडिलांना घरी थांबायला लावलं होतं. वडिलांच्या मृत्यूची बातमी मिळाल्यानंतर तो मुंबईहून निघाला आहे. मृत राजेश यांना आशीष, प्रिन्स, काजल आणि सेजल अशी चार मुलं आहेत. वडिलांच्या मृत्यूनंतर आणि आई व बहिणीवर हत्येचा गुन्हा दाखल झाल्यामुळे प्रिन्स आणि सेजल यांच्या संगोपनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या कुणीही नातेवाईक त्यांना आपल्यासोबत ठेवायला तयार नाहीये. सध्या तरी पोलीसच त्यांचा आधार आहेत.