हातावर फटका मारून मोबाईल चोरणारा अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2019 01:21 PM2019-09-04T13:21:08+5:302019-09-04T13:22:04+5:30

रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या हातावर जोरात फटका मारून मोबाईल चोरी करत असत.

mobile thief arrested who theft in railway | हातावर फटका मारून मोबाईल चोरणारा अटकेत

हातावर फटका मारून मोबाईल चोरणारा अटकेत

googlenewsNext
ठळक मुद्देकारागृहातून सुटताच पुन्हा धंदा सुरू : रेल्वे प्रवासात करायचा चोऱ्या

पुणे : रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या हातावर जोरात फटका मारून मोबाईल चोरी करणाऱ्या एका सराईत चोरट्याला लोहमार्ग पोलिसांनी शिवाजीनगर येथून अटक केली आहे़. 
शाहरुख रशीद खरादी असे अटक केलेल्या सराईताचे नाव आहे़ त्याच्याकडून १६ हजार ५०० रुपयांचे दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत़. यापूर्वी त्यांच्याकडून १ लाख ५५ हजार रुपयांचे १२ महागडे मोबाईल जप्त करण्यात आले असून ६ गुन्हे उघडकीस आले आहेत़. त्याला या गुन्ह्यात शिक्षादेखील झाली होती़. मात्र, कारागृहातून सुटल्यानंतर त्याने पुन्हा चोऱ्या करणे सुरू केल्याचे उघड झाले आहे़. 
रेल्वे प्रवाशांच्या हातावर फटका मारून त्यांचा मोबाईल चोरून नेल्याच्या गुन्ह्यात वाढ झाली होती़. लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस नाईक अमरदीप साळुंकेव महात्मा वाघमारे हे गस्तीवर असताना त्यांना, शिवाजीनगर येथील शाहरुख खरादी त्याच्या साथीदारासह अशा प्रकारचे गुन्हे करतात, अशी माहिती मिळाली़. या माहितीनुसार शिवाजीनगर रेल्वे स्टेशन परिसरात सापळा लावला असता सकाळच्या वेळेस शाहरुख खरादी गुन्हा करण्याच्या हेतूने रेल्वे ट्रॅकच्या कडेला काठी घेऊन तयारीत असताना मिळून आला़. त्याला अटक करून अधिक चौकशी केली तेव्हा त्याने विविध गुन्हे केल्याची कबुली दिली.ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक लोहमार्ग स्थानिक गुन्हे शाखा मौला सय्यद, सहायक निरीक्षक मिलिंद झोडगे, कर्मचारी अमरदीप साळुंके, सचिन पवार, विशाल पवार यांच्या पथकाने केली.
..
हातावर काठी मारून चोरायचा मोबाईल
हातावर काठीने फटका मारून मोबाईल चोरी करणाऱ्या टोळक्यांच्या विरुद्ध लोहमार्ग पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. लोणावळा ते पुणे रेल्वे स्टेशनच्या हद्दीत अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या आरोंपीकडून अडीच लाखांचे मोबाईल जप्त केले असून, १४ जणांना अटक केली आहे़ तसेच दरवाज्यात उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सतर्क राहून प्रवास करण्याचे आवाहन रेल्वे पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे़. 

Web Title: mobile thief arrested who theft in railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.