शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

विवाहित महिला होती लिव्ह इनमध्ये; तिसऱ्याशी ठेवायचे होते संबंध म्हणून तिला प्रियकराने गाडले 

By पूनम अपराज | Updated: March 4, 2021 21:23 IST

Murder :महिलेला गाडण्यासाठी घरात आधीच एक खड्डा बनविला गेला होता आणि सख्खा भाऊ, चुलत भाऊ आणि आईने मिळून 3 ते 4 फूटांच्या खड्ड्यात त्या महिलेचा मृतदेह पुरला आणि त्यावर सिमेंट लावले. घटनेनंतर आरोपी फरार होता.

ठळक मुद्देसंतोष गोलकर याच्याशी तिचे प्रेमसंबंधा असल्यामुळे मोहनखेडी या गावात गेली असल्याची शक्यता कुटुंबातील सदस्यांनी व्यक्त केली होती.

मध्य प्रदेशच्या खरगोन येथील आपल्या नवीन घरात, आपल्या प्रेयसीची हत्या करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. विवाहबाह्य संबंध असलेल्या महिलेवर चारित्र्यावर संशय घेत तिची हत्या करण्यात आली. महिलेला गाडण्यासाठी घरात आधीच एक खड्डा बनविला गेला होता आणि सख्खा भाऊ, चुलत भाऊ आणि आईने मिळून 3 ते 4 फूटांच्या खड्ड्यात त्या महिलेचा मृतदेह पुरला आणि त्यावर सिमेंट लावले. घटनेनंतर आरोपी फरार होता.

या हत्येतील मुख्य आरोपीला पोलिसांनीअटक केली आहे. या हत्येत सहकार्य करणाऱ्या आई, भाऊ आणि चुलतभावाला यापूर्वीच पोलिसांनी अटक केली होती. जिल्हा मुख्यालयापासून ४० किलोमीटर अंतरावर भीकनगाव पोलीस स्टेशन परिसरातील मोहनखेरी येथे बंद घराच्या दुसर्‍या खोलीत दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सिमेंट प्लास्टरखाली दबलेल्या महिलेचा मृतदेह उत्खनन करून बाहेर काढण्यात आल्याने खळबळ उडाली होती. 3 जानेवारी 2021 रोजी पोलिस ठाणे भीकनगाव येथे हरवलेल्या आईची माहिती मुलीने दिली. मुलीला छायाबाई न सांगताच गेल्याची माहिती मिळाली.संतोष गोलकर याच्याशी तिचे प्रेमसंबंधा असल्यामुळे मोहनखेडी या गावात गेली असल्याची शक्यता कुटुंबातील सदस्यांनी व्यक्त केली होती. संतोष गोलकर आणि छाईबाईंचा शोध सुरू करण्यात आला. 27 जानेवारी 2021 रोजी छाताबाईची हत्या केल्यानंतर संतोषने मृतदेह आपल्याच घरात पुरविला असल्याची माहिती मिळाली. या घटनेची माहिती मिळताच एसडीएम भीकनगाव यांना घर खोदण्यासाठी लेखी परवानगी मिळाली आणि कार्यकारी दंडाधिकारी नायब तहसीलदार भीकनगाव यांच्या उपस्थितीत संतोष गोलकर यांच्या घरात खोदकाम केले, तर छाईबाईचा मृतदेह सुमारे ३ फूट ५ इंचाच्या खोलीवर सापडला. या कालावधीत, परिस्थितीजन्य पुरावे व विधानांच्या आधारे, आयपीसीच्या कलम ३०२, २०१, ३४ गुन्हा दाखल करण्यात आला. खुनाच्या घटनेला गांभीर्याने घेत पोलिस अधीक्षक खरगोन शैलेंद्र सिंग चौहान यांनी आरोपींना लवकर अटक करण्याचे निर्देश दिले. फरार आरोपी संतोषचे वडील किशोर गोलकर वय 42 वर्ष रा. मोहनखेरी यांच्या अटकेसाठी पोलिस अधीक्षकांनी दहा हजार रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले. या कारवाईसाठी माहिती देणाऱ्यांना व पोलिस कर्मचार्‍यांना सक्रीय करून माहिती देण्यात आली, याचा परिणाम म्हणून भीकनगाव पोलिसांनी हत्येतील मुख्य आरोपी संतोषला अटक केली.आरोपींनी विचारपूस केल्यावर सांगितले की, त्याचे आणि छाईबाई यांचे प्रेमसंबंध होते, दोघांनाही लग्न करायचे होते, त्यासाठी संतोषने आपली जमीन विकली आणि नवीन घर बांधले आणि इतर व्यवस्था केली. पण संतोष गोलकर यांना छाईबाईच्या चारित्र्यावर संशय होता. त्याने गावातील मजूर दामडिया यांना पाण्याची टाकी बनवण्यास सांगितले आणि 200 रुपये मजुरी देण्याबाबत सांगितले आणि घर खोदले. मग त्याने छायाबाईला निमित्ताने घरी बोलावून तिची हत्या केली आणि घराच्या खड्ड्यात आई साकूबाई, भाऊ सुनील आणि चुलतभाऊ मिस्त्री यांच्या मदतीने मृतदेह खड्ड्यात पुरला. जेणेकरून कोणालाही शंका नसावी. .घटनेनंतर मुख्य आरोपी संतोष फरार झाला. ५ फेब्रुवारीला  या प्रकरणातील सहआरोपी सुनील(28), अनिल (२८), साकुबाई (58) यांना अटक करून न्यायालयात हजर केले. या घटनेतील मुख्य आरोपी संतोषला बैतूल जिल्ह्यातून पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. 

 

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसMadhya Pradeshमध्य प्रदेशmarriageलग्न