Gangrape : ४ दिवस दारू पाजून आदिवासी महिलेवर केला सामूहिक बलात्कार

By पूनम अपराज | Published: February 11, 2021 05:09 PM2021-02-11T17:09:27+5:302021-02-11T17:11:42+5:30

Gangrape in Amravati : या संपूर्ण घटनेची तक्रार पोलिस ठाण्यात करणार असे महिलेने सांगितले, म्हणूनच संतप्त आरोपींनी तिचा खून केला.

Maharashtra Gangrape: Tribal woman gang raped after gave her alcohol for 4 days | Gangrape : ४ दिवस दारू पाजून आदिवासी महिलेवर केला सामूहिक बलात्कार

Gangrape : ४ दिवस दारू पाजून आदिवासी महिलेवर केला सामूहिक बलात्कार

Next
ठळक मुद्देअटक केलेल्या आरोपींमध्ये नामेश मेश्राम, सुधीर रघुपती वानखेडे आणि विनोद तुकाराम वानखेडे यांचा समावेश आहे.

अमरावती - महाराष्ट्रात सामूहिक बलात्काराची घटना अमरावती जिल्ह्यात उघडकीस आली आहे. शिरखेड पोलिसांनी आरोपींना अटक करुन तुरूंगात पाठविले आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये नामेश मेश्राम, सुधीर रघुपती वानखेडे आणि विनोद तुकाराम वानखेडे यांचा समावेश आहे. आरोपींनी महिलेला  चार दिवस खूप दारू पाजली. नंतर तिच्यावर पाशवी अत्याचार करून तिची हत्या केली.

तिवसा तालुक्यातील तळेगाव दाभेरी येथील महिलेचे प्रेत शिवारात चेहरा दगडाने चेचलेल्या व पार्श्वभागात काड्या खुपसलेल्या अवस्थेत ६ फेब्रुवारी रोजी आढळून आला होता. घटनास्थळ शिरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने पोलीस पाटलांच्या फिर्यादीवरून शिरखेड पोलिसांनी भादंविचे कलम ३०२, ३७६, ३७६ (१), ३७६ (२), २०१ अन्वये गुन्हा नोंदविला होता. या गुन्हयाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी हे स्थानिक गुन्हे शाखा व शिरखेड पोलीस ठाण्याच्या सहकार्याने करीत होते. सदर महिलेची ओळख पटल्यावर प्रथम तिचा वीटभट्टीवरील सहकारी नीलेश गोविंद मेश्राम (४२, रा.मनीपूर) याला ७ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली. तथापि, महिलेचा मृतदेह ज्या स्थितीत आढळला, त्यावरून या गुन्ह्यात आणखी काही जण सहभागी असल्याचा होरा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांचा होता. नीलेश हा काही तरी लपवत आहे, हे त्याच्या शारीरिक परिभाषेवरून लक्षात आले होते. त्यामुळे त्याला पोलीस कोठडीदरम्यान विश्वासात घेऊन वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. आता नीलेशने पोलिसांना दिलेल्या कबुलीनुसार, तळेगाव येथील गावगुंड सुधीर रघुपती वानखडे व विनोद तुकाराम वानखडे यांनी मृत महिलेचा खून केला. यानंतर त्यांनी नीलेशला हत्येचा आरोपी होण्यास सांगितले व तसे न केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.


असा केला खून नीलेशच्या कथनानुसार, १ फेब्रुवारी.रोजी सकाळी १० वाजता मृत महिला ही वीटभट्टीवरून सारवायला शेण घेऊन येते, असे सांगून गेली होती. ४ फेब्रुवारीपर्यंत सुधीर व विनोद याांनी तिला त्यांचेकडे ठेवून घेतले. रघुपती वानखडे याच्या पडीक शेतात दोन्ही आरोपींनी तिच्यावर लैंगिक अत्याचार व निर्घृण खून केला. यानंतर त्यांनी नीलेशला धमकावून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.

काय प्रकरण आहे?
अमरावती जिल्ह्यातील शिरखेड पोलिस स्टेशनअंतर्गत तळेगाव येथे एका आदिवासी महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. त्यावेळी याप्रकरणी पोलिसांनी निलेश मेश्राम यांना अटक केली. पोलिस चौकशीत आरोपी मेश्राम यांनी उर्वरित गुन्हेगारांची नावेही दिली, त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटकही केली. या संपूर्ण घटनेची तक्रार पोलिस ठाण्यात करणार असे महिलेने सांगितले, म्हणूनच संतप्त आरोपींनी तिचा खून केला.

गुन्हे शाखेच्या मदतीने आरोपीला अटक
याप्रकरणी गुन्हे शाखेची मदत घेत फरार असलेल्या दोन आरोपींना स्थानिक पोलिसांनी (महाराष्ट्र पोलिसांनी) अटक केली असून, निलेश मेश्राम याने सांगितले की, इतर दोन आरोपींनी मिळून महिलेची हत्या केली होती. आरोपीविरूद्ध हत्या आणि सामूहिक बलात्कारासह इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण आहे. आरोपींच्या मोबाईल लोकेशनच्या मदतीने फरार असलेल्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

Web Title: Maharashtra Gangrape: Tribal woman gang raped after gave her alcohol for 4 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.