शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

आजीच्या प्रेमात प्रियकरानं ३ वर्षाच्या मुलीचा काटा काढला; बलात्कार करुन केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 16:35 IST

Rape And Murder Case: या प्रकरणाचा खुलासा करत नोएडा पोलिसांनी आरोपी हेमंत (५५) याला अटक केली आहे. आरोपी हा खानपूर, बुलंदशहर येथील रहिवासी आहे.

आजीच्या प्रियकराने तीन वर्षांच्या मुलीची हत्या केली होती. ती चिमुरडी प्रेमप्रकरण आणि लग्नात अडथळे होती. आरोपीने मुलीवर बलात्कार करून तिची विटा आणि दगडाने ठेचून हत्या केली होती. या प्रकरणाचा खुलासा करत नोएडा पोलिसांनी आरोपी हेमंत (५५) याला अटक केली आहे. आरोपी हा खानपूर, बुलंदशहर येथील रहिवासी आहे. या प्रकरणात आजीची भूमिकाही तपासली जात आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. तेथून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

नोएडा सेंट्रल डीसीपी हरीश चंदर यांनी सांगितले की, मुलीचा मृतदेह २८ डिसेंबर रोजी कोतवाली फेज-2 परिसरातील इलाबन्स गावात एका बांधकाम सुरू असलेल्या (निर्माणाधीन) घरात सापडला होता. चिमुकलीच्या आजीने (५०) २५ डिसेंबर रोजी नातं बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या प्रकरणाची चौकशी केली असता एक खळबळजनक खुलासा समोर आला. तपासानंतर पोलिसांनी सोमवारी हेमंतला अटक केली. डीसीपीने सांगितले की, हेमंत हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून तो भाजीपाल्याची गाडी लावतो. मुलीचे वडील तुरुंगात असून आई तिला सोडून माहेरी गेली. चिमुकली आजीकडे राहते.येथे मुलीची आजी आणि आरोपी हेमंत यांच्यात जवळीक वाढली होती आणि एकमेकांशी प्रेमसंबंध सुरू होते. हेमंत त्यांच्या घरी जात असे. हेमंतने प्रेमसंबंध व लग्नात अडथळे आणत असल्याचे समजून ३ वर्षाच्या मुलीचा वीट व दगडाने ठेचून खून केला होता. खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह इमारतीत पडलेल्या प्लायमध्ये लपवून ठेवण्यात आला होता.बेपत्ता असल्याची तक्रार आजीने केली होती

वडील तुरुंगात गेल्यावर आणि आईने माहेर सोडल्यानंतर तीन वर्षांच्या मुलीसाठी आजीच सर्वस्व होती. मात्र, खून प्रकरणात आजीची भूमिका संशयास्पद आहे. त्याची चौकशी सुरू आहे. मुलगी बेपत्ता झाल्याची फिर्याद आजीने दिली होती.तीन पथकांनी ७५ हून अधिक लोकांची चौकशी केली

मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर तपासासाठी तीन पथके तयार करण्यात आली. पोलीस पथकाने मृत मुलीची आई, आजी यांच्यासह कुटुंबातील ७५ हून अधिक जणांची चौकशी केली होती. तुरुंगात डांबलेल्या वडिलांचीही चौकशी करण्यात आली. या तपासादरम्यान एका व्यक्तीचे मुलीच्या आजीसोबत प्रेमसंबंध असल्याचे निष्पन्न झाले.

अटक करण्यात आलेल्या आरोपीवर ९ गुन्हे दाखल 

अटक आरोपी हेमंतवर नऊ गुन्हे दाखल आहेत. यामध्ये मसुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दरोडा, बुलंदशहर कोतवालीमधील चोरी अशा इतर कलमांन्वये नोंद आहे. आरोपी फेज दोन परिसरात राहून ओळख लपवून भाजीची गाडी लावत असल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणRajasthanराजस्थानPoliceपोलिसArrestअटकDeathमृत्यू