तीन मुलीचं मायेचं छत्र हरवलं; मोबाईल चोराच्या झटापटीत महिलेचा लोकलखाली येऊन मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 08:39 PM2021-06-01T20:39:51+5:302021-06-01T20:40:57+5:30

Woman dies after falling under locol train : डोंबिवली पश्चिमेकडिल भोईर चाळीत ज्ञानेश्वर पाटील व विद्या पाटील हे दाम्पत्य सहा महिन्यांची चिमुकली परी ,6 वर्षांची मेधा ,9 वर्षाची पूर्वा या आपल्या तीन चिमुकल्या मुलींसह राहत होते.

Lost the supprt of love of three daughters; Woman dies after falling under locol train | तीन मुलीचं मायेचं छत्र हरवलं; मोबाईल चोराच्या झटापटीत महिलेचा लोकलखाली येऊन मृत्यू

तीन मुलीचं मायेचं छत्र हरवलं; मोबाईल चोराच्या झटापटीत महिलेचा लोकलखाली येऊन मृत्यू

Next
ठळक मुद्देएकीकडे सर्वसामान्य प्रवाशांना रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जात नसताना चोरटे, पाकीटमार, गर्दुल्ल्याना मात्र रेल्वे स्थानकात सहज प्रवेश कसा काय मिळतो असा सवाल उपस्थित झाला आहे.

डोंबिवली - लॉकडाऊन काळात एकीकडे चोरीच्या घटना वाढल्या असताना कळवा रेल्वे स्थानकातही एक धक्कादायक घटना घडली आहे. मोबाईल चोराशी झालेल्या झटापटीत एका महिला प्रवाशाचा लोकलखाली येऊन  दुर्देवी मृत्यू झाला आहे. विद्या पाटील अस या महिलेचं नाव असून ती डोंबिवली कुंभारखान पाडा येथे राहणा-या आहेत. विद्या यांच्या  मृत्यूमुळे त्यांच्या तीन मुलींवरील मायेचं छत्रही हरवलं आहे. यामध्ये 6 महिन्याच्या मुलीचाही समावेश आहे. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करत फजिल शेख या सराईत चोरट्याला अटक केली आहे. मात्र, एकीकडे सर्वसामान्य प्रवाशांना रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जात नसताना चोरटे, पाकीटमार, गर्दुल्ल्याना मात्र रेल्वे स्थानकात सहज प्रवेश कसा काय मिळतो असा सवाल उपस्थित झाला आहे.

       

शनिवारी सायंकाळी विद्या नेहमी प्रमाणे अंधेरी येथून  लोकलने घरी परतत होत्या. लोकल संध्याकाळी 8च्या सुमारास कळवा स्थानकात पोहचली . कळवा स्थानकातून लोकल मार्गस्थ होताच एका चोरट्याने महिलांच्या डब्यात प्रवेश करत उभ्या असलेल्या विद्या यांच्या हातातील मोबाईल खेचून पळ काढला. चोरट्याच्या मागे विद्या यांनी देखील चालत्या लोकलमधून उडी मारून चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र झटापटीत त्या लोकल खाली फेकल्या गेल्या त्यातच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती इतर प्रवासी महिलांनी रेल्वे पोलिसांना दिल्यानंतर अज्ञात चोरट्या विरोधात महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करत फ़ैजल शेख याला अटक केली आहे . दरम्यान या दुर्घटनेनंतर विद्याच्या नातेवाईकांनी या आरोपीला कठोर शिक्षा व्हावी तसेच त्याच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.


      

डोंबिवली पश्चिमेकडिल भोईर चाळीत ज्ञानेश्वर पाटील व विद्या पाटील हे दाम्पत्य सहा महिन्यांची चिमुकली परी ,6 वर्षांची मेधा ,9 वर्षाची पूर्वा या आपल्या तीन चिमुकल्या मुलींसह राहत होते . ज्ञानेश्वर हे इलेक्ट्रिशन असून विद्या या एका खाजगी कंपनीत काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होत्या. विद्या यांच्या अचानकपणे जाण्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या घटने नंतर रेल्वे पोलिसांच्या कामगिरीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकीकडे सर्वसामान्य प्रवाशांना रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जात नसताना चोरटे, पाकीटमार, गर्दुल्ल्याना मात्र रेल्वे स्थानकात सहज प्रवेश कसा काय मिळतो. लॉकडाऊन मध्ये देखील रेल्वे पुलावर गर्दुल्याचा वावर कसा काय असू शकतो रेल्वे पोलिसाकडून त्यांच्या बाबतीत बघ्याची भूमिका का घेतली जाते. नियम केवळ सर्वसामान्य गरिबासाठीच आहेत का? असे अनेक सवाल उपस्थित होत  आहेत .
 

आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्यावर यागोदारही अनेक गुन्हे दाखल आहेत. आमच्यावर जी वेळ आली तशी वेळ कोणावरही येऊ नये. विद्याचा फोन त्या दिवशी बराच वेळ लागत नव्हता. त्यानंतर पोलिसांनी मला कळवा स्थानकात बोलावून घेतले तेव्हाच माझ्या मनात भीती निर्माण झाली. फलाटावर देखील  रेल्वे पोलिस कर्मचारी तैनात असावेत. - ज्ञानेश्वर पाटील, मयत  विद्याचे पती
 

 

जेव्हा सामान्य माणसाला रेल्वे स्थानकात प्रवेश करताना त्याची चौकशी केली जाते? मग चोरटे गर्दुल्ले रेल्वे स्थानकात कसे काय प्रवेश करतात? हा प्रश्न आहे. या संदर्भात  रेल्वे प्रशासनाची  आम्ही तक्रार केली आहे. - कमलाकर पाटील, मयत विद्या यांचे नातेवाईक

Web Title: Lost the supprt of love of three daughters; Woman dies after falling under locol train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.