Last few pages of Sushant Singh Rajput's diary crucial, can hint at killer: Sushant's family lawyer Vikas SinghLast few pages of Sushant Singh Rajput's diary crucial, can hint at killer: Sushant's family lawyer Vikas Singh Bihar cop probing Sushant Singh | सुशांतच्या डायरीची शेवटची पाने महत्वाची, सुगावा लागू शकतो मारेकऱ्याचा

सुशांतच्या डायरीची शेवटची पाने महत्वाची, सुगावा लागू शकतो मारेकऱ्याचा

ठळक मुद्देया डायरीतील शेवटच्या पानांमधून महत्वाचे धागेदोरे हाती लागू शकतात आणि मारेकऱ्याचा सुगावा लागू शकतो असा दावा सुशांचे वडील के के सिंग यांचे वकील विकास सिंग यांनी केला आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाबाबत त्याच्या पर्सनल डायरीतून खूप मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. जूनमध्ये मुंबईपोलिसांनी सुशांतची डायरी जप्त केली होती. ही डायरी आता सीबीआयच्या हाती लागली आहे. मात्र, आता सुशांतच्या डायरीची काही पानं फाडल्याचं निदर्शनास आलं आहे. तसेच या डायरीतील शेवटच्या पानांमधून महत्वाचे धागेदोरे हाती लागू शकतात आणि मारेकऱ्याचा सुगावा लागू शकतो असा दावा सुशांचे वडील के के सिंग यांचे वकील विकास सिंग यांनी केला आहे.

सुशांत नियमित डायरी लिहायचा. याबाबत त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेनेही माहिती दिली होती. वर्तमानातील नोंदी आणि भविष्यातील त्याची स्वप्नं या डायरीमध्ये उतरवत असे. शिवाय काही आर्थिक बाबीच्या नोंंदी असल्याची देखील माहिती मिळते आहे. त्यामुळे सीबीआय तपासात सुशांतची ही डायरी खूप महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

सुशांतचे वडील के के सिंह यांचे वकील विकास सिंह यांनीदेखील या डायरीचा उल्लेख केला होता. या डायरीतून अनेक खुलासे होऊ शकतात असं त्यांनी सांगितलं होतं. मात्र, या डायरीतील काही पानं गायब आहेत.तरी देखील या डायरीतील शेवटची पाने खूप मोठा उलगडा करू शकतात.जूनमध्ये मुंबईपोलिसांनी सुशांतच्या चार डायऱ्या जप्त केल्या होत्या. त्यावेळी पोलिसांना बरीच माहिती मिळाली. सुशांतच्या कंपनीत रिया चक्रवर्ती आणि शोविक चक्रवर्ती हे भागीदार आहेत ही माहिती त्यांना मिळाली. कंपनीत संचालक कोण कोण असतील, त्यांच्या भूमिका काय असतील, त्यांचा आर्थिक सहभाग इत्यादी सर्व गोष्टींबाबत सुशांतने माहिती लिहिली होती. दरम्यान सुशांतची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्ती तिचा भाऊ, वडील आणि सुशांतची बिझनेस मॅनेजर श्रुती मोदी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ईडीकडून त्यांची चौकशी सुरू आहे. सुशांतच्या बँक खात्यातून थेट शोविकच्या खात्यात पैसे वळवण्यात आल्याच्या नोंदी आहेत. कोटक बँकेतून हे पैशाचे व्यवहार झाल्याचं या अकाउंट्सवरून स्पष्ट होतं आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रियाच्या 2 प्रॉपर्टीसंदर्भात तिची चौकशी केली जात आहे. त्याचप्रमाणे तिला ईडीकडून बँक स्टेटमेंट, इनकम टॅक्स रिटर्न, उत्पन्नाचे साधन आणि बचत यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे.

रिया चक्रवर्तीने महेश भटसह या लोकांना केले होते कॉल्स, रिपोर्टमधून समोर आले सत्य

सुशांतने आत्महत्येच्या एक दिवस आधी अनेक बडे चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांशी आधीच्या सिनेमांविषयी चर्चा केली होती. 12 मिनिटांच्या आत त्यांनी 5 वेळा कॉल केला. यात निखिल आडवाणी, रमेश तौराणी यांची नाव सामील आहे. रिपोर्टनुसार, रिया चक्रवर्तीच्या कॉल डिटेल्सचीही तपासणी करण्यात आली आहे. रियाने एक्स मॅनेजर श्रुती मोदीला अनेक फोन केले. श्रुती, सुशांतची एक्स मॅनेजर होती. त्यानंतर रिया सुशांतच्या मॅनेजर सॅम्युअल मिरांडाला कॉल केला, मग सुशांतशी बोलणं केले. श्रुती मोदी आणि सॅम्युअल मिरांडा विरोधात सुशांतच्या वडिलांनी आणि CBI ने FIR दाखल केले आहे.  रिया चक्रवर्ती, तिचे वडील, आई, भाऊ यांच्यासह एकूण सहा जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. रिपोर्टनुसार रिया 147 वेळा सुशांतशी बोलली. 808 कॉल श्रुतीला तर 289 कॉल्स सॅम्युअलला केले. फिल्ममेकर महेश भट यांचं नाव देखील कॉल डिटेल्समध्ये समोर आले आहे. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

...चांगला मेसेज गेला नाही; बिहार पोलीस अधिकाऱ्याला क्वारंटाईन केल्याबद्दल SC ने कान खेचले!

 

Disha Salian Case: नारायण राणेंच्या गंभीर आरोपानंतर पोलिसांचं पुराव्यांसाठी आवाहन

 

खळबळजनक! कारागृहात कैद्याने गळफास लावून केली आत्महत्या 

 

सुशांत राजपूत प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत आलेले बिहारचे पोलीस परतले; १२ जणांची केली चौकशी

 

डॉक्टर की हैवान! भिवंडीत अल्पवयीन मुलीवर डॉक्टरने केला लैंगिक अत्याचार

 

बापरे! आजी आजोबांनी केले अश्लील चाळे अन् लावले अल्पवयीन मुलीला जबदस्तीने बघायला 

 

तीन दिवसांनी नदीच्या प्रवाहात उड्या मारणाऱ्या अबदरचा मृतदेह सापडला  

 

मनसेच्या अविनाश जाधव यांचा जामीन कोर्टाने केला मंजूर

 

Disha Salian Death Case: मरण्यापूर्वी तब्बल 45 मिनिटे फोनवर बोलली दिशा, 'या' गोष्टींचा केला उल्लेख

 

संताप झाला अनावर! रागाच्या भरात पठ्ठ्याने चक्क बॉसच्या नावे पाठवले सेक्स टॉय

Web Title: Last few pages of Sushant Singh Rajput's diary crucial, can hint at killer: Sushant's family lawyer Vikas SinghLast few pages of Sushant Singh Rajput's diary crucial, can hint at killer: Sushant's family lawyer Vikas Singh Bihar cop probing Sushant Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.