Doctor sexually abuses a minor girl in Bhiwandi | डॉक्टर की हैवान! भिवंडीत अल्पवयीन मुलीवर डॉक्टरने केला लैंगिक अत्याचार

डॉक्टर की हैवान! भिवंडीत अल्पवयीन मुलीवर डॉक्टरने केला लैंगिक अत्याचार

ठळक मुद्देडॉक्टरला अजूनही अटक केली नसून याप्रकरणाची चौकशी सुरु असल्याची माहिती शांतीनगर पोलिसांनी दिली आहे.

भिवंडी - कोरोनाच्या महामारीत जगभर डॉक्टर रुग्णांचे प्राण वाचवत आहेत. मात्र, वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणारी घटना भिवंडीत घडली आहे. 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर डॉक्टरने अत्याचार केला असल्याची खळबळजनक घटना भिवंडीत समोर आली आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात नराधम डॉक्टर विरोधात मंगळवारी पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने तक्रार केली असता या नराधमावर विविध कालामांतर्गत अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आला आहे.
                 

30 जुलै रोजी 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी तिची व तिच्या आईची तब्बेत बरी नसल्याने दोघीही गुलजार नगर येथील डॉ. बदरुजमा खान याच्याकडे उपचारासाठी गेल्या होत्या. यावेळी डॉक्टरने दोघींनाही तपासून व उपचार करून परत दुसऱ्या दिवशी तपासण्यासाठी बोलावले होते. दरम्यान दुसऱ्या दिवशी 31 जुलै रोजी मुलीची तब्बेत बरी नव्हती मात्र घरी काम असल्यामुळे मुलीच्या आईने तिच्या सोबत 10 वर्षाच्या मुलाला सोबत पाठवले होते. दुपारी 12 ते 1 वाजेच्या दरम्यान डॉ बदरुजमा खान याने मुलीचा तपासणीचा नंबर येऊनही तिला तपासले नाही . तिला सर्वात शेवटी तपासण्यासाठी बोलावले व दवाखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला देखील कामानिमित्त बाहेर पाठवले होते.  मुलीच्या सिबत गेलेल्या लहान भावाला पैसे सुट्टे आणण्याच्या बहाण्याने घरी पाठवले होते. यादरम्यान दवाखान्यात कुणीही नसल्याचा फायदा उचलत या डॉक्टरने मुलीवर अत्याचार केला . सदर प्रकार पीडित मुलीने आपल्या मावशीला सांगितला असता मावशीला धक्काच बसला व तिने पीडित मुलीच्या आईला आपल्या घरी बोलावून सदरचा प्रकार कथन केला. याप्रकरणी मुलीच्या आईने घटनेच्या पाच दिवसा नंतर मंगळवारी 4 ऑगस्ट रोजी शांतीनगर पोलीस ठाण्यात नराधम डॉक्टरबाबत तक्रार केली असता शांतीनगर पोलिसांनी डॉक्टर विरोधात भा.दं. वि. कलम 354 ( ए ) , 376 (2)( इ) , 376 (सी) ( डी) सह बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अशा विविध कालामांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मात्र, डॉक्टरला अजूनही अटक केली नसून याप्रकरणाची चौकशी सुरु असल्याची माहिती शांतीनगर पोलिसांनी दिली आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

अर्णब गोस्वामीविरुद्ध पोलिसांकडे तक्रार, अटक करण्याची मागणी

 

रक्षाबंधनसाठी माहेरी आलेली महिला, प्रियकराने गोळ्या घालून केली हत्या

 

संगमनेरात बजरंग दलाचे पदाधिकारी ताब्यात

 

...चांगला मेसेज गेला नाही; बिहार पोलीस अधिकाऱ्याला क्वारंटाईन केल्याबद्दल SC ने कान खेचले!

 

Disha Salian Case: नारायण राणेंच्या गंभीर आरोपानंतर पोलिसांचं पुराव्यांसाठी आवाहन

 

खळबळजनक! कारागृहात कैद्याने गळफास लावून केली आत्महत्या 

 

सुशांत राजपूत प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत आलेले बिहारचे पोलीस परतले; १२ जणांची केली चौकशी

 

अविनाश जाधव यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली

 

Web Title: Doctor sexually abuses a minor girl in Bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.