Disha Salian Death Case: Disha spoke on the phone for 45 minutes before death, mentioning 'these' things | Disha Salian Death Case: मरण्यापूर्वी तब्बल 45 मिनिटे फोनवर बोलली दिशा, 'या' गोष्टींचा केला उल्लेख

Disha Salian Death Case: मरण्यापूर्वी तब्बल 45 मिनिटे फोनवर बोलली दिशा, 'या' गोष्टींचा केला उल्लेख

ठळक मुद्देमुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मृत्यू होण्यापूर्वी दिशा सालियनने एका मित्राशी फोनवर दीर्घ चर्चा केली.

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर सुशांतची असिस्टंट  मॅनेजर दिशा सालियनचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. आता सुशांत आणि दिशाचे प्रकरण एकमेकांशी जोडलेले दिसू लागले आहेत. चाहते आणि काही लोकांचा असा विश्वास आहे की, या दोन प्रकरणांमधील दुवा जोडला जाऊ शकतो. मात्र, सुशांतच्या प्रकरणात दिशाचं नाव आल्याने दिशाच्या वडिलांनी आक्षेप घेतला आहे. सुशांत आणि दिशाच्या आत्महत्या प्रकरणात प्रत्येक क्षणाला एक नवीन आणि आश्चर्यकारक माहिती समोर येत आहे. दरम्यान, आता मुंबईपोलिसांनीही दिशाच्या आत्महत्येचा धक्कादायक खुलासा केला आहे.

मुंबईपोलिसांच्या म्हणण्यानुसार, मृत्यू होण्यापूर्वी दिशा सालियनने एका मित्राशी फोनवर दीर्घ चर्चा केली. मरण्यापूर्वी दिशाने एका मित्राशी 45 मिनिटे फोनवर बातचीत केली. या 45 मिनिटांच्या संभाषणांमध्ये त्याने आपल्या व्यावसायिक जीवनाबद्दल गोष्टी शेअर केल्या. मात्र, नेमक्या काय गोष्टी शेअर केल्या याबाबत ठोस माहिती मिळाली नाही आहे. दिशा सालियन हीचा 8 जून रोजी मुंबईतील एका इमारतीतून पडल्यामुळे मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर त्याच दिवशी 9 जून रोजी दिशाचा मृतदेह शताब्दी रुग्णालयात नेण्यात आला. 11 जून रोजी दिशाची कोविड टेस्ट झाली होती, ती निगेटिव्ह होती. त्यानंतर दिशाची ऑटोप्सी करण्यात आली.  

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

...चांगला मेसेज गेला नाही; बिहार पोलीस अधिकाऱ्याला क्वारंटाईन केल्याबद्दल SC ने कान खेचले!

 

Disha Salian Case: नारायण राणेंच्या गंभीर आरोपानंतर पोलिसांचं पुराव्यांसाठी आवाहन

 

खळबळजनक! कारागृहात कैद्याने गळफास लावून केली आत्महत्या 

 

सुशांत राजपूत प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत आलेले बिहारचे पोलीस परतले; १२ जणांची केली चौकशी

 

डॉक्टर की हैवान! भिवंडीत अल्पवयीन मुलीवर डॉक्टरने केला लैंगिक अत्याचार

 

बापरे! आजी आजोबांनी केले अश्लील चाळे अन् लावले अल्पवयीन मुलीला जबदस्तीने बघायला 

 

तीन दिवसांनी नदीच्या प्रवाहात उड्या मारणाऱ्या अबदरचा मृतदेह सापडला  

 

मनसेच्या अविनाश जाधव यांचा जामीन कोर्टाने केला मंजूर

Web Title: Disha Salian Death Case: Disha spoke on the phone for 45 minutes before death, mentioning 'these' things

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.