शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
2
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
3
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
4
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
5
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
6
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
7
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
8
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
9
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
10
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
11
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
12
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
13
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
14
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
15
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
16
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
17
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
18
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
19
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
20
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी

कंपनीचे लाखो रुपये लुटणारी टोळी जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2020 11:58 PM

चोरट्यांनी 6 लाख 20 हजारांच्या मुद्देमालासह अटक

 सांगली : आटपाडी येथे आठ महिन्यांपूर्वी खासगी कंपनीची साडेअकरा लाख रुपयांची रोकड लूटणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांना यश आले. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, चोरट्याकडून सहा लाख २० हजारांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. धनराज ऊर्फ सोन्या सतीश पाटील (वय २५, रा. शिवाजी हौसिंग सोसायटी, सांगली), रोहित शशिकांत भगत (१९, रा. बिसूर, ता. मिरज) व लक्ष्मण मारुती सिंदगी (२३, रा. साखर कारखाना वसाहत, सांगली) अशी संशयितांची नावे आहेत. आटपाडी परिसरातील फ्लिपकार्ट, एलआयसी, इंस्टाकार्ट, डिलिव्हरी कंपनी व ईको एक्स्प्रेस कंपनीची रोकड जमा करण्याचे काम मोहन सुखदेव शिंदे (३४) हे करीत होते. ७ आॅक्टोबर २०१९ रोजी दुपारी एकच्यासुमारास शिंदे हे चार कंपन्यांकडील ११ लाख ६२ हजार ३१ रुपयांची रोकड घेऊन करगणी बँकेकडे निघाले होते. यावेळी वाटेत दोन मोटारसायकलस्वारांनी शिंदे यांना काठीने मारहाण करून त्यांच्याकडील रोकड लंपास केली होती.

याप्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी जबरी चोरी, घरफोडीतील गुन्हेगारांचा शोध घेण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला दिले होते. एलसीबीचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक प्रवीण शिदे, हेडकॉन्टेबल बिरोबा नरळे, नीलेश कदम, संदीप गुरव, सागर लवटे, संदीप नलवडे, संतोष गळवे, अनिल कोळेकर, शंकर पाटील यांचे पथक सांगली शहरात पेट्रोलिंग करीत असताना माधवनगर रस्त्यावरील आरटीओ बसस्थानकाजवळ तिघेजण विनानंबरची मोटारसायकल घेऊन संशयितरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली.

पथकाने छापा टाकून धनराज पाटील, रोहित भगत, लक्ष्मण सिंदगी या तिघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता, तिघांनी आटपाडीत साडेअकरा लाखांची रोकड चोरल्याची कबुली दिली. संशयितांकडून चार लाख दहा हजारांची रोकड, एक लाख १५ हजारांचे तीन महागडे मोबाईल, मोटारसायकल असा ६ लाख २० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. तब्बल आठ महिन्यांनंतर जबरी चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले.

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसRobberyचोरी