अग्निशस्त्रांची तस्करी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पदार्फाश; १९ लाख ८९ हजारांचे ४२ पिस्तूल,६६ काडतुसे जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 06:37 PM2020-07-16T18:37:24+5:302020-07-16T18:39:19+5:30

राज्यात ७५ पिस्तूल, गावठी कट्टे विक्री केल्याचे उघड

Interstate gang was arrested by pimpri police who smuggling of firearms | अग्निशस्त्रांची तस्करी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पदार्फाश; १९ लाख ८९ हजारांचे ४२ पिस्तूल,६६ काडतुसे जप्त

अग्निशस्त्रांची तस्करी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पदार्फाश; १९ लाख ८९ हजारांचे ४२ पिस्तूल,६६ काडतुसे जप्त

googlenewsNext
ठळक मुद्देपिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारची कामगिरी :

पिंपरी : अग्निशस्त्रांची अवैध तस्करी करणाऱ्या २६ आरोपींच्या मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील आंतररोज्य टोळीचा पदार्फाश झाला आहे. पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने ही कामगिरी केली. या पथकाने मध्यप्रदेशात दोन दिवस तळ ठोकून वेशांतर करून मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळल्या. १५ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून १९ लाख ८९ हजार ५०० रुपये किमतीचे ४२ पिस्तूल, ६६ जिवंत काडतुसे जप्त केली.

गणेश मारुती माळी (वय २६, रा. जुनी सांगवी, पिंपरी-चिंचवड), ग्यानोबा उर्फ गोटु मारुती गित्ते (वय ३०, रा. परळी, जि. बीड), मनिसिंग गुरमुखसिंग भाटीया (वय ३५, रा. सिंघाना, जि. धार, मध्यप्रदेश), योगेंद्र जगदीश भांबूरे, कुश नंदकुमार पवार (दोघेही रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ), प्रसन्न ज्ञानेश्वर पवार (वय २५, रा. गोडुंब्रे, ता. मावळ), आकाश उर्फ बाळू जगन्नाथ वाघमोडे (वय २५, रा. पटेल चौक, कुडुर्वाडी, जि. सोलापूर), योगेश विठ्ठल कांबळे (वय २४, रा. थेरगाव, मूळ रा. शिराळा, ता. परांडा, जि. उस्मानाबाद), चेतन उर्फ मामा गोविंद लिमन (वय २८, रा. लिंबाची तालीम, ता. हवेली), प्रकाश उर्फ पप्पू किसन मांडेकर (वय २७), सिराज सलीम शेख (वय ३४, दोघेही रा. आंबेठाण, ता. खेड, जि. पुणे), तुषार महादू बावकर (वय २५, रा. कासारसाई, ता. मुळशी), प्रज्ञेश संजय नेटके (वय २३, रा. गावडे-भोर आळी, चिंचवडगाव), योगेश उर्फ आबा बापूराव तावरे (वय २४, रा. माळेगाव, ता. बारामती), अक्षय दिलीप केमकर (वय २८, रा. मेडद, ता. माळशिरस, जि. सोलापूर) असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने आरोपी गणेश माळी याला अटक करून त्याच्याकडून अग्निशस्त्र जप्त केले होते. आरोपी गोटू गित्ते याच्याकडून त्याने ते घेतल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी आरोपी गित्ते याला अटक केली. त्या दोघांकडून सहा पिस्तूल, गावठी कट्टे व १५ जिवंत काडतुसे जप्त केली. आरोपी गित्ते याने मध्यप्रदेशातून ही अग्निशस्त्रे खरेदी केल्याचे तपासात समोर आले. 

पोलिसांनी मध्यप्रदेशात वेशांतर करून दोन दिवस तळ ठोकून या टोळीचा प्रमुख आरोपी मनिसिंग भाटीया याला अटक केली. त्याच्याकडून ११ गावठी पिस्तूल व २२ जिवंत काडतुसे जप्त केली. आरोपी भाटीया व त्याचा साथीदार कालुसिंग जसवंतसिंग (रा. सिंघाना, जि. धार, मध्यप्रदेश) यांनी आरोपी कुश पवार, प्रसन्न पवार, आकाश वाघमोडे, योगेश कांबळे, गोटु गित्ते या टोळी प्रमुखांना मोठ्या प्रमाणात अग्निशस्त्रे विकल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी पथके तयार करून या आरोपींना अटक केली. आरोपी कुश पवार, प्रसन्न पवार, प्रकाश मांडेकर, सिराज शेख यांनी मध्यप्रदेशातून पिस्तूल, गावठी कट्टे आणून ते महाराष्ट्रात विक्री केली. यातील २६ आरोपी निष्पन्न झाले असून, यात काही सराईत गुन्हेगारांना ही शस्त्रे विक्री केल्याचे समोर आले. यातील आरोपी शिवकुमार मुरगन ऊर्फ बल्ली (रा. देहूरोड) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असता, त्याला होम क्वारंटाईन केले असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्याला नोटीस बजावण्यात आली आहे. क्वारंटाइन कालावधी संपल्यानंतर त्याला अटक करण्यात येईल.  

आरोपी यांच्याकडून १९ लाख ८९ हजार ५०० रुपये किमतीची ४२ पिस्तूल, गावठी कट्टे व ६६ जिवंत काडतुसे तसेच एक चारचाकी वाहन जप्त केले आहे. यातील काही आरोपींवर विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असून, आणखी शस्त्रांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. युनिट चारचे सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख तपास करीत आहेत. 

युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख, पोलीस कर्मचारी प्रवीण दळे, नारायण जाधव, संजय गवारे, धर्मराज आवटे, दादाभाऊ पवार, आदिनाथ मिसाळ, संतोष असवले, तुषार शेटे, लक्ष्मण आढारी, मोहम्मद गौस नदाफ, वासुदेव मुंडे, शावरसिध्द पांढरे, प्रशांत रौद, सुनील गुट्टे, तुषार काळे, सुरेश जायभाये, अजिनाथ ओंबासे, धनाजी शिंदे, सुखदेव गावंडे, नागेश माळी, राजेंद्र शेटे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Web Title: Interstate gang was arrested by pimpri police who smuggling of firearms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.