तस्करीमागे आंतरराष्ट्रीय ड्रग्जमाफियांची टोळी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 03:59 AM2020-08-13T03:59:45+5:302020-08-13T03:59:56+5:30

मुख्य सूत्रधाराच्या शोधात तपास अधिकारी

International drug gang behind the smuggling 1 thousand crore heroine | तस्करीमागे आंतरराष्ट्रीय ड्रग्जमाफियांची टोळी

तस्करीमागे आंतरराष्ट्रीय ड्रग्जमाफियांची टोळी

Next

- मधुकर ठाकूर 

उरण : जेएनपीटी बंदरातून जप्त केलेल्या एक हजार कोटींच्या हेरॉईन तस्करीप्रकरणी आंतराष्ट्रीय ड्रगमाफियांशी संबंध जोडला जात असून मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्यासाठी तपास अधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती डीआरआय सूत्रांनी दिली. या प्रकरणी पाच जणांना अटक केली आहे.

जेएनपीटी बंदरात अफगाणिस्तानातून इराणमार्गे पाठविण्यात आलेले एक हजार कोटी किमतीचे १९१ किलो हेरॉइन सीमाशुल्क आणि डीआरआय विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाई करून जप्त केले. या प्रकरणी मालाची कागदपत्रे तयार करून कस्टम क्लीअरन्सची जबाबदारी सांभाळणाºया मीनानाथ बोडके, कोंडीभाऊ गुंजाळ यांना याआधीच अटक केली आहे. त्यांच्या चौकशीनंतर एक्स्पोर्ट कंपनीचा मालक सुरेश भाटिया आणि त्याचे दोन कामगार मोहम्मद नौमान आणि महेंद्र निगम यांना अटक केली आहे. या आरोपींची पार्श्वभूमी गुन्हेगारी क्षेत्रांशी संबंधित आहे. त्यांच्यावर याआधीही अमलीपदार्थांच्या तस्करीप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. या हेरॉइन आयात प्रकरणात त्यांचा मोठा सहभाग आहे. त्यांच्या तपासातूनच या प्रकरणातील मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचता येणार आहे. मात्र, तपास पूर्ण झाल्याखेरीज आणि तपास कामात अडथळा निर्माण होण्याची शक्यता असल्याने, अधिक माहिती देणे उचित नसल्याचे डीआरआय सूत्रांनी सांगितले.

सागरी आणि हवाई मार्गाचा वापर
अफगाणिस्तानातून ८० टक्के तसेच युरोपीय देशातून आंतरराष्ट्रीय ड्रगमाफियांमार्फत जगभर मोठ्या प्रमाणात तस्करी होते. सागरी आणि हवाई मार्गाने चालणाºया तस्करीतून नफा मिळत असल्याने दहशतवादी संघटनाही याकडे वळल्या आहेत. तस्करीच्या पैशांतून शस्त्रास्त्रे खरेदी आणि कारवाया केल्या जातात.

Web Title: International drug gang behind the smuggling 1 thousand crore heroine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.