शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

चिकनची पार्टी जीवावर बेतली! पार्टीसाठी पैसे दिले नाही या वादातून मित्राची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 13:42 IST

याबाबत खारघर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झाला असून आरोपी मनू शर्माला अटक केली आहे

नवी मुंबई - खारघरच्या बेलपाडा आदिवासी वाडीत क्रिकेटच्या लाकडी बॅटने चेहऱ्यावर आणि पाठीवर हल्ला करून जयेश वाघे या तरुणाची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपी मनू शर्माला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्षुल्लक कारणावरून ही हत्या झाल्याचं समोर आले. मृत जयेश हा पनवेल महानगरपालिका येथे सफाई कामगार म्हणून काम करायचा. 

माहितीनुसार, २३ जानेवारीला रात्रीच्या सुमारास क्रिकेट मैदानाच्या बाजूच्या रस्त्यावर आदिवासी वाडी, बेलपाडा, खारघर येथे जयेश आणि त्याचे इतर मित्र हे चिकन बनवत होते. तेव्हा चिकन पार्टीसाठी काहीही पैसे न दिल्याच्या कारणावरून जयेश आणि मनू यांच्यात वाद झाला, शिवीगाळ करण्यात आली. हा वाद टोकाला गेला आणि जयेशने मनू याच्या कानाखाली मारली. याचा राग आल्याने मनू याने जयेशला हाताबुक्क्यांनी छातीत, पोटावर मारहाण केली. मनूचा राग अनावर झाला होता. त्यातून त्याने  क्रिकेटच्या लाकडी बॅटने जयेशच्या चेहऱ्यावर, पाठीवर हल्ला केला. यात जयेश हा गंभीर जखमी झाला. त्याला एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून खारघर पोलिसांनी मनू शर्मा याला अटक केली.

दरम्यान, २३ तारखेला मृत जयेश वाघे त्याच्या मित्रांसोबत क्रिकेटच्या ग्राऊंडवर जेवण बनवण्यासाठी गेला होता. तेव्हा त्याचा मित्र या घटनेतील आरोपी मनू शर्मा याच्यात कॉन्ट्रीब्यूशनचे पैसे देत नाही या कारणावरून वाद झाला. आम्ही तुला जेवायला देणार नाही अशी बाचाबाची झाली. या वादात मनू शर्माने रागाच्या भरात जयेशला बांबूने, हाताबुक्क्याने मारले. जयेश या मारहाणीत गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यानंतर २७ तारखेला त्याचा मृत्यू झाला. याबाबत खारघर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झाला असून आरोपी मनू शर्माला अटक केली आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी