धक्कादायक! दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पत्नीवर पतीनं फेकलं ऍसिड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 11:53 IST2022-01-20T11:52:03+5:302022-01-20T11:53:31+5:30

ऍसिड हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू

in bihar Husband throws acid on wife who resists drinking | धक्कादायक! दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पत्नीवर पतीनं फेकलं ऍसिड

धक्कादायक! दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पत्नीवर पतीनं फेकलं ऍसिड

बक्सर: दारुड्या पतीनं पत्नीवर ऍसिड फेकल्याची घटना बिहारच्या बक्सरमध्ये घडली आहे. दारू पिण्यास विरोध करत असल्यानं पतीनं पत्नीवर ऍसिड फेकलं. यामध्ये पत्नीला गंभीर इजा झाली. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

जग नारायण जास्त दारू प्यायचा. त्यामुळे त्याचा पत्नी सवितासोबत अनेकदा वाद व्हायचा. सविता आणि जग नारायणचा विवाह २०१६ मध्ये झाला. जग नारायण दारूच्या आहारी गेल्यानं पत्नीसोबत दररोज भांडणं व्हायची, अशी माहिती सविताच्या भावानं दिली. जग नारायण सोबत सतत होत असलेल्या भांडणांना कंटाळून सविता काही दिवसांपूर्वी माहेरी आली होती. जग नारायण तिथे तिला भेटायला आला. रात्री अचानक त्यानं सवितावर ऍसिड टाकलं. त्यामुळे सविता गंभीररित्या भाजली. 

'सविताला सासरी पाठवा असं जग नारायण आमच्या वडिलांना सतत सांगत होता. पण सविता सासरी जाण्यास तयार नव्हती. जग नारायणनं दारू सोडली, तरच मी सासरी जाईन असं तिनं सांगितलं. त्यामुळे जग नारायण संतापला. त्यानं टिफिनमधून आणलेलं ऍसिड सवितावर टाकलं. तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला आणि तिथून पळून गेला,' असं सविताच्या भावानं सांगितलं. 

Web Title: in bihar Husband throws acid on wife who resists drinking