मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 13:49 IST2025-05-19T13:44:11+5:302025-05-19T13:49:10+5:30

Bengaluru Techie Death News: निखिल शिक्षणात खूप हुशार होता. त्याने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून बिझनेस एनालिटिक्स मॅनेजमेंट शिक्षण पूर्ण केले होते

In Bengaluru 25-year-old engineer suicide due to work pressure; angered by manager's behavior in ola krutim | मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल

मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल

बंगळुरू - ओलाची एआय कंपनी कृत्रिममध्ये काम करणाऱ्या २५ वर्षीय इंजिनिअरचा मृत्यू झाला आहे. कंपनीत कामाच्या प्रेशरमुळे कर्मचाऱ्याने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलले आहे. ८ मे रोजी ही घटना घडली. निखिल सोमवंशी नावाच्या इंजिनिअरचा मृतदहे सापडला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. ऑगस्ट २०२४ मध्ये निखिलने कंपनी ज्वाईन केली होती. 

निखिलच्या मृत्यूची बातमी सर्वात आधी रेडिटवर एका पोस्टच्या माध्यमातून झाली. या पोस्टमध्ये म्हटलं होते की, निखिलवर कामाचे खूप जास्त प्रेशर होते. ज्यामुळे त्याने हे पाऊल उचलले. रेडिटची ही पोस्ट व्हायरल झाली आहे. त्यात लोकांनी ओलाच्या कृत्रिममध्ये कामाच्या वातावरणावरून संताप व्यक्त केला आहे. तिथे काम करण्याची पद्धत खूप टॉक्सिक असल्याचा आरोप नेटिझन्सने केला आहे. 

शिक्षणात हुशार होता निखिल

निखिल शिक्षणात खूप हुशार होता. त्याने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून बिझनेस एनालिटिक्स मॅनेजमेंट शिक्षण पूर्ण केले होते. कृत्रिममध्ये ज्वाईन होण्यापूर्वी निखिलने नॅचुरल लॅग्वेंज प्रोसेसिंग इंजिनिअर केले होते. २०२४ मध्ये सुरुवातीचे सहा महिने त्याने इंटर्नशिप केली. त्याच्या काही सहकाऱ्यांनी निखिलवर कामाचा दबाव टाकला. राजकिरण पानुगंटी नावाच्या मॅनेजरच्या त्रासाला कंटाळून अनेक सहकाऱ्यांनी नोकरी सोडली होती. 

एका रेडिट युजरने म्हटलं की, पानुगंटी नव्या कर्मचाऱ्यांसोबत वाईट पद्धतीने वागत असे. ऑफिसमध्ये भीतीदायक वातावरण बनवले होते. त्यामुळे बरेच जण नोकरी सोडत होते. तर निखिलच्या मृत्यूने आम्ही दु:खी आहोत, पोलिसांच्या तपासात योग्य ते सहकार्य करू असं कृत्रिम कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितले. त्याशिवाय निखिल सुट्टीवर होता असेही कंपनीने म्हटलं. ८ एप्रिलला निखिलने मॅनेजरशी संवाद साधला. त्याला आरामाची गरज आहे असं त्याने सांगितले तेव्हा त्याला सुट्टी देण्यात आली होती. १७ एप्रिलला त्याला बरे वाटू लागले. मात्र आणखी आरामाची गरज असल्याने सुट्टी वाढवून घेतली असा दावा कंपनीने केला आहे.

दरम्यान, कंपनीतील कर्मचाऱ्यांनीही नाव न सांगण्याच्या अटीवर मॅनेजरबाबत तक्रार सांगितली. तो ज्यूनिअर कर्मचाऱ्यांना हीन वागणूक देतो. मॅनेजरच्या वर्क प्रेशरमुळे अनेकजण नोकरी सोडून गेलेत. काहींनी तर दुसरी नोकरी मिळण्याच्या आधीच कंपनीतून राजीनामा देणे पसंत केले. कर्मचाऱ्यांचा अपमान करणे, त्याला नको ते बोलणे, यामुळे कर्मचारी त्याच्या वर्तवणुकीला कंटाळलेत असा आरोप कंपनी सोडलेल्या कर्मचाऱ्यांनी केला.

Web Title: In Bengaluru 25-year-old engineer suicide due to work pressure; angered by manager's behavior in ola krutim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.