Ashok Kharat : भोंदू अशोक खरात आता ईडी, फॉरेक्सच्याही रडारवर; विदेश दौऱ्यांची, व्यवहारांची चौकशी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 12:06 IST2026-03-27T12:04:42+5:302026-03-27T12:06:25+5:30

Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे कोट्यवधीचे आर्थिक 'उद्योग' बघता आता त्याच्या मागे ईडी, विदेशी चलन (फॉरेक्स) आणि कस्टमचाही ससेमीरा लागण्याची चिन्हे आहेत.

Impostor Ashok Kharat now on the radar of ED, Forex; Foreign trips and transactions will be investigated | Ashok Kharat : भोंदू अशोक खरात आता ईडी, फॉरेक्सच्याही रडारवर; विदेश दौऱ्यांची, व्यवहारांची चौकशी होणार

Ashok Kharat : भोंदू अशोक खरात आता ईडी, फॉरेक्सच्याही रडारवर; विदेश दौऱ्यांची, व्यवहारांची चौकशी होणार

नाशिक : भोंदू अशोक खरातचे कोट्यवधीचे आर्थिक 'उद्योग' बघता आता त्याच्या मागे ईडी, विदेशी चलन (फॉरेक्स) आणि कस्टमचाही ससेमीरा लागण्याची चिन्हे आहेत. खरातच्या व्यवहाराची कागदपत्रे आता सक्त वसुली संचनालयाकडे (इडी) देण्यात येणार असल्याचे समजते. तसेच त्याच्या विदेश दौऱ्यांची व विदेशी चलन व्यवहारांची फॉरेक्सकडून चौकशी होणार आहे, तर दुसरीकडे त्याने तुर्कस्थानमधून आणलेल्या फर्निचरप्रमाणेच मोठ्या प्रमाणावर विदेशातून आणलेल्या अन्य साहित्यावर कस्टम ड्युटी भरली किंवा नाही याचीही तपासणी करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.

भोंदू खरातचे एकेक कारनामे उघड होत असून, महिलांच्या शोषणापलीकडे आर्थिक फसवणूक, खंडणी असे प्रकारदेखील समोर येत आहेत. काही तक्रारीत याचा ऊहापोह झाला असला तरी त्याच्या स्थावर जंगम मालमत्तांमधील तरतूद, गुंतवणूक तसेच अन्य आर्थिक व्यवहार बघता ही अचंबित करणारी
खरात फाइल्स श्रीमंती तक्रारीच्या रूपाने बाहेर पडत आहे. नाशिक आणि नगर मिळून ५२ मिळकतींची माहिती आहे. 

अशोक खरातचा पिस्तूल परवाना रद्द; फार्महाऊसवर सापडली २१ काडतुसं, ८ गुन्हे दाखल

काही ठिकाणी तो स्वतः मिळकतीचा मालक आहे, तर कुटुंबासह भागीदारीत जमिनी आहेत. दुर्मीळ भासणारे बनावट खडे, रत्न, पॉलिश केलेले चिंचोके, बनावटी मध विकून मिळवलेली माया आता चौकशीला पात्र ठरली आहे. हा आकडा प्रचंड मोठा असल्याने आयकर विभागापाठोपाठ पोलिसांकडून सक्त वसुली संचलनालयालादेखील कागदपत्रे देण्यात येणार आहेत. तसेच पुण्यातील बांधकाम व्यावसायिक राजेंद्र जासूद यांनी बुधवारी (दि. २५) रात्री नाशिक पोलिसांकडे तक्रार केली. त्यात जासूद यांच्या पैशावर २१ देशांत विदेशात सहली केल्याचे म्हटल्याने फॉरेक्स चलनाशी संबंधित विभागही तपासणी करणार आहे.

"... तर तुझा मृत्यू अटळ", भोंदूबाबा अशोक खरातने थेट तुर्कस्थानातून मागवलं ९० लाखांचं फर्निचर

"नादाला लागाल तर तुमचे नामोनिशाण नष्ट करू"; भोंदू अशोक खरातने अंनिसला दिलेली धमकी

कस्टम विभागाचाही फेरा

खरातच्या कारनाम्यामुळे अनेक शासकीय यंत्रणांप्रमाणेच कस्टम विभागाच्याही तो रडारवर असल्याचे समजते. तुर्कस्थानातून तब्बल २० लाख रुपयांचे फर्निचर आणून त्याने सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील फार्म हाऊस सजवले. तुर्की टेबलसह अनेक प्रकारचे साहित्य त्याने विदेशातून आणले आहे. त्याची कस्टम ड्युटी भरली किंवा नाही त्याचीही आता तपासणी होणार असल्याचे वृत्त आहे.
 

Web Title : फर्जी अशोक खरात ईडी, विदेशी मुद्रा स्कैनर के अधीन; वित्तीय अनियमितताएं।

Web Summary : अशोक खरात वित्तीय सौदों, विदेश यात्राओं और सीमा शुल्क को लेकर ईडी, विदेशी मुद्रा जांच का सामना कर रहे हैं। धोखाधड़ी की शिकायतों के बाद अधिकारी संपत्तियों, निवेशों और संदिग्ध लेनदेन की जांच कर रहे हैं। उसका पिस्तौल लाइसेंस रद्द कर दिया गया, और उसके फार्महाउस पर 21 कारतूस पाए गए। उस पर एक तर्कवादी समूह को धमकी देने का भी आरोप है।

Web Title : Bogus Ashok Kharat under ED, Forex scanner for financial irregularities.

Web Summary : Ashok Kharat faces ED, Forex scrutiny over financial dealings, foreign trips, and customs duties. Authorities investigate assets, investments, and suspicious transactions after fraud complaints. His pistol license was revoked, and 21 cartridges were found at his farmhouse. He also allegedly threatened a rationalist group.