आरोपी रिक्षाचालकाला अटक न केल्यास मनसे आक्रमक पवित्रा घेणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 06:23 PM2019-08-06T18:23:10+5:302019-08-06T18:24:47+5:30

नालासोपारा - पश्चिमेकडील परिसरात एका २५ वर्षीय तरुणीला गाण्यांचा आवाज कमी करण्यासाठी सांगितल्याचा राग मनात धरून रिक्षाचालकाने केलेल्या मारहाणीप्रकरणी फक्त नालासोपारा ...

If the accused rickshaw driver is not arrested, the MNS will do aggressive protest | आरोपी रिक्षाचालकाला अटक न केल्यास मनसे आक्रमक पवित्रा घेणार

आरोपी रिक्षाचालकाला अटक न केल्यास मनसे आक्रमक पवित्रा घेणार

Next
ठळक मुद्देतरुणीला गाण्यांचा आवाज कमी करण्यासाठी सांगितल्याचा राग मनात धरून रिक्षाचालकाने मारहाण केली पोलीस ठाण्यात जाऊन सर्व हकीकत सांगितल्यानंतर आरोपी रिक्षाचालकाविरोधात वेगवेगळ्या कलमानव्ये गुन्हा दाखल केला होता.

नालासोपारा - पश्चिमेकडील परिसरात एका २५ वर्षीय तरुणीला गाण्यांचा आवाज कमी करण्यासाठी सांगितल्याचा राग मनात धरून रिक्षाचालकाने केलेल्या मारहाणीप्रकरणी फक्त नालासोपारा पोलिसांनी गुन्हेगारावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून अद्यापपर्यंत फरार आरोपी रिक्षाचालकाला अटक न केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी सकाळी वसई, विरार, नालासोपारा शहराच्या समस्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारीव कार्यकर्त्यांनी मारहाण केलेल्या पीडित तरुणीला घेऊन नालासोपारा पोलीस ठण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत लब्दे यांची भेट घेतली. तसेच लवकरात लवकर आरोपी रिक्षाचालकाला अटक न केल्यास मनसे कार्यकर्ते आक्रमक भूमिका घेतील असा इशारा या वेळी देण्यात आला आहे. मुंब्रा येथे आरोपी पळाला असल्याची माहिती मिळाली असून त्याला पकडण्यासाठी एक टीम पाठवली असल्याचे पोलीस निरीक्षक वसंत लब्दे यांनी लोकमतला बोलताना सांगितले आहे. 

नेमकी घटना काय? 

नालासोपारा पश्चिमेकडील समेळ पाडा परिसरात राहणारी 25 वर्षीय तरुणी शनिवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास घरी जाण्यासाठी ओव्हरब्रिजच्या खाली रिक्षा स्टँडवर येऊन रिक्षात बसली. बसलेल्या रिक्षात तरुणी बसल्यावर जोरात आवाजाने टेप लावण्यात आल्यावर तरुणीने आवाज कमी करण्यास सांगितले. पण रिक्षा चालकाने त्या एकट्या तरुणीसोबत हुज्जत घालून टेपचा आवाज अजून वाढवला. सदर तरुणीला शिविगाळ केल्यावर जाब विचारल्यावर रागामध्ये रिक्षाचालकाने मारहाण करण्यास सुरुवात करून नंतर तिला रस्त्यावर आडवे पाडून लाथाबुक्यांनी मारहाण केल्यामुळे ती गंभीर जखमी झाली आहे. जखमी झालेल्या तरुणीने रिक्षाचा नंबर घेऊन नालासोपारा पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस ठाण्यात जाऊन सर्व हकीकत सांगितल्यानंतर आरोपी रिक्षाचालकाविरोधात वेगवेगळ्या कलमानव्ये गुन्हा दाखल केला होता.

Web Title: If the accused rickshaw driver is not arrested, the MNS will do aggressive protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.