शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मी दाऊद इब्राहिमचा राईट हॅन्ड बोलतो!, गृहमंत्र्यांना पुन्हा धमकीचा फोन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2020 20:44 IST

आज फोन करणाऱ्याने ज्या पद्धतीने बोलणी केली, ते पाहता कुणीतरी हा खोडसाळपणा करीत असावा, असा अंदाज पोलिसांनी बांधला आहे.

ठळक मुद्देफोन करणाऱ्याने स्वतःला दाऊद इब्राहिमचा राईट हॅन्ड सांगून गृहमंत्री देशमुख यांना कंगना रानौत प्रकरणात लक्ष देऊ नका, असे म्हटले.

नागपूर : गृहमंत्री अनिल देशमुख यांना शनिवारी आणि रविवारी धमकीचे फोन आल्यानंतर तपास यंत्रणांनी फोन करणार्‍यांची चौकशी सुरू केली असतानाच मंगळवारी सकाळी पुन्हा देशमुख यांच्या बंगल्यावर धमकीचा फोन आला. फोन करणाऱ्याने स्वतःला दाऊद इब्राहिमचा राईट हॅन्ड सांगून गृहमंत्री देशमुख यांना कंगना रानौत प्रकरणात लक्ष देऊ नका, असे म्हटले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख या तिघांना वेगवेगळ्या वेळी आलेल्या धमकीच्या फोनमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या संबंधाने सर्वत्र चर्चेचे रान पेटले असताना तपास यंत्रणांनी फोन करणाऱ्यांना शोधण्यासाठी वेगवेगळी पथके कमी लावली आहे. या पार्श्वभूमीवर, मंगळवारी सकाळी ११. ३४ ला गृहमंत्री देशमुख यांच्या स्थानिक निवासस्थानी लँड लाईनवर पुन्हा धमकीचा फोन आला. ऑपरेटरने फोन करणाऱ्याला त्याचे नाव विचारले असता मी दाऊद इब्राहिमचा राईट हॅण्ड खालीद बोलतो, असे तो म्हणाला. 'तुझ्या साहेबांना माझे नाव सांग आणि कंगना रानौत प्रकरणात जास्त लक्ष देऊ नका. असा निरोप दे, असे कॉलर म्हणाला आणि त्याने फोन बंद केला.शनिवारी रात्री देशमुख यांच्या स्वीय सहाय्यकाच्या मोबाईलवर  चार वेळा , रविवारी आणि मंगळवारी बंगल्यावर दोन वेळा धमकीचे फोन आले. आज फोन करणाऱ्याने ज्या पद्धतीने बोलणी केली, ते पाहता कुणीतरी हा खोडसाळपणा करीत असावा, असा अंदाज पोलिसांनी बांधला आहे.पोलीस आयुक्त म्हणतात, मी बघतो!या संबंधाने लोकमतने पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याशी संपर्क साधला. गृहमंत्री धमकी प्रकरणाच्या तपासात काय घडामोडी आहे, अशी त्यांना विचारणा केली असता, सांगण्यासारखे काही नाही असे ते म्हणाले. आज पुन्हा धमकीचा फोन आला, याकडे त्यांचे लक्ष वेधले असता मी बघतो, असे म्हणत त्यांनी फोन कापला.

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

मुंबईची तुलना POK शी करणं कंगनाला भोवणार?, सामान्य मुंबईकराची पोलीस ठाण्यात तक्रार

 

मातोश्री उडवून देण्याच्या धमकीनंतर दाऊद इब्राहिमच्या प्रतिमेचे एनएसयूआयतर्फे दहन

 

वेगळं वळण : रियाने सुशांतच्या बहिणीविरोधात केली मुंबई पोलिसात तक्रार, हे आहे कारण!

 

खळबळजनक! पोलिसांसमोरच हत्येच्या आरोपीची जमावाने मरेपर्यंत केली मारहाण

 

रियाने केला मोठा खुलासा, २५ बॉलिवूड सेलिब्रिटींना NCB चौकशीसाठी बोलावण्याचा तयारीत

 

सर्वात मोठी बातमी! रियाला अटक, मेडिकलसाठी NCB ची टीम घेऊन जाणार

 

‘रिया ही तर बळीचा बकरा, तिनं सुशांत प्रकरणातील मास्टरमाईंडची नावं उघड करावीत’

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखDawood Ibrahimदाऊद इब्राहिमnagpurनागपूरPoliceपोलिसHome Ministryगृह मंत्रालय