शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 21:17 IST

Husband Wife Crime News: शेजाऱ्यांनी हस्तक्षेप करून कशीबशी थांबवली हाणामारी

एका व्यक्तीचा त्याच्या पत्नीशी प्रचंड वाद झाला. रागाच्या भरात त्या व्यक्तीने आपल्या पत्नीच्या नाकाचा चावा घेतला आणि नाकाचे दोन तुकडे करून टाकले. विद्या असे ३० वर्षीय महिलेचे नाव असल्याचे समजते आणि सध्या ती शिवमोगा शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. ही घटना ८ जुलै रोजी दुपारी घडली. दोघेही दावणगेरे जिल्ह्यातील चन्नागिरी तालुक्यातील मंतरघट्टा गावातील रहिवासी आहेत. नेमका कशावरून घडला वाद, जाणून घेऊया.

विद्या आणि तिचा पती विजय यांच्यात कर्ज फेडण्यावरून भांडण सुरु झाले. वाद प्रचंड वाढला. हाणामारीदरम्यान विद्या जमिनीवर पडली आणि विजयने तिचे नाक चावले, ज्यामुळे तिच्या नाकाचा पुढचा भाग कापला गेला. स्थानिकांनी हस्तक्षेप करून विद्याला शिवमोगा येथील मेगन रुग्णालयात नेले, तेथून तिला अधिक चांगल्या उपचारांसाठी खाजगी रुग्णालयात पाठवण्यात आले. विद्याच्या तक्रारीवरून, शिवमोगा येथील जयनगर पोलिस ठाण्यात मेडिको-लीगल केस (MLC) दाखल करण्यात आली आणि नंतर दावणगेरे येथील चन्नागिरी पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आली. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मे महिन्यात उत्तर प्रदेशातील कानपूरमध्येही अशीच एक घटना घडली होती. कार पार्किंगवरून झालेल्या वादात एका व्यक्तीने निवासी सोसायटीच्या सचिवाचे नाक कापले होते. ही घटना नारामऊ परिसरातील रतन प्लॅनेट निवासी सोसायटीमध्ये घडली. तिथे वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि व्यापारी राहतात. या प्रकरणात पोलिसांनी सांगितले होते की, टोकाच्या वादानंतर क्षितिज मिश्राने निवासी सोसायटीचे सचिव आरएस यादव यांना अनेक वेळा फटके मारले. नंतर त्यांचे नाक इतके जोरात चावले की त्यांच्या नाकाचा तुकडा पडला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदार