हॉटेल व्यावसायिकाला गंडा; ED कडून मध्य प्रदेशातील भाजप आमदाराचा मेहूणा अखेर अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 07:24 IST2025-06-04T07:20:14+5:302025-06-04T07:24:34+5:30

या प्रकरणात मनी लाँड्रिंग झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ईडीने न्यायालयात विनंती करून त्याचा ताबा मिळवला आहे.

Hotelier got cheated ED arrests brother-in-law of BJP MLA from Madhya Pradesh | हॉटेल व्यावसायिकाला गंडा; ED कडून मध्य प्रदेशातील भाजप आमदाराचा मेहूणा अखेर अटकेत

हॉटेल व्यावसायिकाला गंडा; ED कडून मध्य प्रदेशातील भाजप आमदाराचा मेहूणा अखेर अटकेत

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मध्य प्रदेशातील एका हॉटेल व्यावसायिकाला भरघोस परताव्याच्या गुंतवणुकीचे आमिष दाखवत त्याला गंडा घातल्याप्रकरणी ईडीने मध्य प्रदेशातील भाजपा आमदाराच्या मेव्हण्याला अटक केली आहे. ९७ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी यापूर्वी त्याला मुंबई पोलिसांनी अटक केली होती. मात्र, या प्रकरणात मनी लाँड्रिंग झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ईडीने न्यायालयात विनंती करून त्याचा ताबा मिळवला आहे.

सुधांशू द्विवेदी असे या व्यक्तीचे नाव असून तो व आमदाराची पत्नी असलेली त्याची बहीण एका गुंतवणूक कंपनीमध्ये संचालक आहेत. या कंपनीद्वारे गुंतवणूक केल्यास तुम्हाला मोठ्या प्रमाणावर परतावा देऊ, असे आमिष त्याने या हॉटेल व्यावसायिकाला दाखवले होते. संबंधित हॉटेल व्यावसायिकाने त्याच्या सांगण्यावरून दोन कंपन्यांमध्ये ४५२ कोटी रुपये हस्तांतरीत केले. मात्र, कालांतराने या ४५२ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीपैकी केवळ ३५५ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीवरच त्याला परतावा मिळाला. अन्य रकमेवर परतावा न मिळाल्याने त्याने मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. या आधारे सुधांशूला अटक करण्यात आली. मात्र, याप्रकरणी मनी लाँड्रिंग झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ईडीने त्याला ताब्यात घेतले.याप्रकरणी आमदाराच्या पत्नीची चौकशी होण्याची शक्यता आहे.

Web Title: Hotelier got cheated ED arrests brother-in-law of BJP MLA from Madhya Pradesh