शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

प्रामाणिकपणा! रिक्षाचालकाने प्रवाशाचे हरवलेले पैसे केले परत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2020 16:07 IST

एकीकडे काही मुजोर रिक्षाचालकांमुळे रिक्षाचालकांची प्रतिमा मलिन होत असताना राममिलन या रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ठळक मुद्दे राममिलन यादव असे या ४२ वर्षीय प्रामाणिक रिक्षाचालकाचे नाव आहे. प्रवासी अभिषेक साळवी हे आपली २० हजार रोकड व महत्वाची कागदपत्रे असलेली बॅग रिक्षात विसरले होते.मुंबई गिरगाव येथे राहणारे अभिषेक साळवी सोमवारी आपल्या कुटुंबासह कल्याणात आले होते.

कल्याण - कल्याण येथे प्रामाणिक रिक्षाचालकाने एका प्रवाशाचे रिक्षात राहिलेली बॅग आणि २० हजार रुपयांची रोख रक्कम परत करून माणुसकी शिल्लक असल्याचे पटवून दिले आहे. राममिलन यादव असे या ४२ वर्षीय प्रामाणिक रिक्षाचालकाचे नाव आहे. प्रवासी अभिषेक साळवी हे आपली २० हजार रोकड व महत्वाची कागदपत्रे असलेली बॅग रिक्षात विसरले होते. रिक्षाचालक राममिलन यांनी साळवी यांना संपर्क करत सदर बॅग बाजारपेठ पोलीस स्थानकात दिली. एकीकडे काही मुजोर रिक्षाचालकांमुळे रिक्षाचालकांची प्रतिमा मलिन होत असताना राममिलन या रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मुंबई गिरगाव येथे राहणारे अभिषेक साळवी सोमवारी आपल्या कुटुंबासह कल्याणात आले होते. साळवी कुटुंबासह रिक्षाने प्रवास करीत असताना ते २० हजार रोकड आणि महत्वाची कागदपत्रे असलेली बॅग रिक्षात विसरले होते. या संदर्भात पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. मात्र, त्यांना रिक्षाचा नंबर माहित नव्हता. मात्र, सदर रिक्षाचालक राममिलन यादव याने प्रामाणिकपणा दाखवत बॅगेत असलेल्या कागदपत्रांच्या आधारे साळवी यांच्याशी संपर्क साधत त्यांनी बॅग व २० हजारांची रोकड बाजारपेठ पोलीस स्टेशनला जमा केली. धकाधकीच्या जीवनात पैशांची निकड असताना आणि हातावरील प्रपंच असून देखील रिक्षाचालक राममिलन यादव यांनी प्रामाणिकपणे सापडलेली बॅग परत केल्याने पोलीस स्टेशन येथे रिक्षाचालकाचा बुके देऊन सत्कार करण्यात आला. त्यांनी दाखवलेला प्रामाणिकपणा खरंच कौतुकास्पद असून इतरांनी प्रेरणा घेण्याची गरज आहे.

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाPoliceपोलिसkalyanकल्याणMONEYपैसा