शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

बाबो! पाच गर्लफ्रेंडसची हौस भागविण्यासाठी पठ्ठ्या करत होता मोबाईल चोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2020 7:34 PM

Mobile Robbery : मोबाईल चोरटा गजाआड

ठळक मुद्दे निखिल ठाकरे असे या चोरटयाचे नाव असून त्याच्याकडून दहा मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. एका साथीदाराच्या मदतीने हा चोरटा मोबाईल हिसकावून पळ काढायचा.

कल्याण: कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांनी एका मोबाईल चोरटयाला अटक केली आहे. त्याच्या चोरीचे कारण जाणून घेता एक दोन नव्हे तर चकक पाच गर्लफ्रेंडसची हौस भागविण्यासाठी तो मोबाईल चोरत असल्याचे समोर आले आहे. निखिल ठाकरे असे या चोरटयाचे नाव असून त्याच्याकडून दहा मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. एका साथीदाराच्या मदतीने हा चोरटा मोबाईल हिसकावून पळ काढायचा.

कल्याण डोंबिवली परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोबाईल चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. दुचाकीवर स्वार होऊन आलेले दोन चोरटे लोकांच्या हातातील मोबाईल हिसकावून पसार व्हायचे. कल्याण पश्चिमेतील वालधूनी परिसरात एका तरु णाचा मोबाईल हिसकावून चोरटयांनी पळ काढल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. या सीसीटीव्हीच्या मदतीने महात्मा फुले पोलिसांनी तपास सुरु  केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांच्या पथकाने केलेल्या तपासात यश आले असून भिवंडी येथे राहणा-या निखिल ठाकरे याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून पोलिसांनी दहा मोबाईल हस्तगत केले. कल्याणमधील तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. त्याने अन्य मोबाईल कुठून चोरले आहे याचा तपास सुरु  आहे. तसेच, त्याच्या साथीदाराचा शोध सुरु  आहे. निखिल याला पाच गर्लफ्रेंड आहेत. तो प्रत्येक गर्लफ्रेंडची हौस भागवतो. त्याच्याकडे खूप पैसा आहे हे दाखविण्यासाठी निखिलने मोबाईल चोरणे सुरु  केले. या सोबतच पोलिसांनी दुस-या प्रकरणातील दोन मोबाईल चोरटे गजाआड केले आहेत. यात अविनाश विठ्ठल आणि  एका अल्पवयीन मुलाला अटक करुन त्याच्यांकडूनही मोबाईल हस्तगत केले आहेत.

टॅग्स :RobberyचोरीMobileमोबाइलkalyanकल्याणPoliceपोलिसArrestअटक