लुटेरी दुल्हन! वय २४ वर्षे अन् केली १५ लग्न; ५२ लाखांचा गंडा, नवऱ्याला सोडून जाते पळून अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 16:01 IST2025-11-21T15:59:31+5:302025-11-21T16:01:18+5:30
वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी तब्बल १५ वेळा लग्न केलं.

लुटेरी दुल्हन! वय २४ वर्षे अन् केली १५ लग्न; ५२ लाखांचा गंडा, नवऱ्याला सोडून जाते पळून अन्...
गुजरातच्या विविध जिल्ह्यांमध्ये तरुणांशी लग्न करून त्यांचे पैसे घेणाऱ्या 'लुटेरी दुल्हन गँग'ला पोलिसांनी अटक केली आहे. चौकशीने पोलिसांनाही मोठा धक्का बसला. या गँगचा भाग म्हणून अटक करण्यात आलेल्या चांदणीने वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी तब्बल १५ वेळा लग्न केलं होतं. रोख रक्कम आणि दागिने मिळून तब्बल ५२ लाखांचा गंडा घातला आहे. चार वेळा लग्न केलेल्या एका महिलेला देखील अटक करण्यात आली आहे.
लग्नानंतर काही दिवसांतच नवरी फरार व्हायची. जेव्हा तरुण त्यांचे पैसे परत मागण्यासाठी फोन करायचे तेव्हा त्यांच्यावर बलात्काराचे खोटे आरोप लावण्याची धमकी दिली जायची. आदिवाडा येथील तरुणाने १२ ऑगस्ट २०२४ रोजी अहमदाबाद येथील चांदणी रमेशभाई राठोडशी लग्न केलं. लग्नापूर्वी त्याच्याकडून ५ लाख रुपये, सोन्या-चांदीचे दागिने, कपडे आणि एक मोबाईल घेतला.
लग्नानंतर अवघ्या चार दिवसांनी तिचा एक भाऊ आला आणि तिचे वडील आजारी असल्याचं कारण सांगून तिला घेऊन गेला. नंतर चांदणी परत आली नाही आणि तिचा मोबाईल बंद होता, ज्यामुळे तरुणाचा संशय बळावला. संपूर्ण गँगने गुजरातच्या विविध जिल्ह्यांमध्ये लग्न करू इच्छिणाऱ्या लोकांना टार्गेट केलं. त्यांनी बनावट नावांनी आधार कार्ड तयार केले आणि लोकांची फसवणूक केली.
इतर जिल्ह्यांमध्येही फसवणूक करण्यात आली आहे. महिलेने साबरकांठाच्या हिम्मतनगर तालुक्यातील काकरोल गावातील एका पुरुषाशी लग्न केलं आणि २.९० लाख घेऊन पळ काढला. मेहसाणाचे पोलीस अधीक्षक हिमांशू सोलंकी यांनी सांगितलं की, चांदणीने एकूण १५ लग्नं केली होती. तिने प्रत्येक लग्नातून लोकांकडून पैसे उकळले. गँगने ५२ लाख रुपयांवर डल्ला मारला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.