हनिमूनच्या रात्री नवरी फक्त 'हे' म्हणाली, नवरदेव निघून गेला अन् परतलाच नाही; नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 12:27 IST2025-12-01T12:26:42+5:302025-12-01T12:27:36+5:30
एक नवरदेव अचानक बेपत्ता झाला आहे. मोहसीन उर्फ मोनू असं त्याचं नाव आहे.

फोटो - आजतक
उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एक नवरदेव अचानक बेपत्ता झाला आहे. मोहसीन उर्फ मोनू असं त्याचं नाव आहे. मोहसीन त्याच्या हनिमूनच्या रात्री १२:०० वाजता त्याच्या खोलीतून बाहेर पडला आणि तेव्हापासून तो बेपत्ता आहे. चार दिवस झाले तरी त्याचा कोणताही पत्ता लागलेला नाही. त्याच्या कुटुंबाने बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे. पोलीस आता गंगा कालव्याजवळ त्याचा शोध घेत आहेत.
बुधवारी मोहसीनची लग्नाची वरात मुझफ्फरनगरमधील खतौली येथे गेली आणि लग्न समारंभानंतर तो त्याच्या वधूसह घरी परतला. रिपोर्टनुसार, हनिमूनच्या रात्री मोहसीन वधूसह त्याच्या खोलीत झोपायला गेला. खोलीत वधूने त्याला एक ग्लास दूध दिलं, नंतर म्हणाली, "खोलीत प्रकाश खूप जास्त आहे, कृपया एक छोटा बल्ब आणा." यानंतर मोहसीन घरातून निघून गेला आणि परत आलाच नाही.
मोहसीन १२:०० वाजता घरातून निघाला पण अजून परतला नाही. कुटुंबाने त्याचा शोध सुरू केला. नातेवाईकांकडे आणि परिसरात शोध घेतल्यानंतरही त्यांना कोणतीही माहिती मिळाली नाही, म्हणून त्यांनी पोलिसांना कळवलं. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले, ज्यामध्ये मोहसीन शेवटचा गंगा कालव्याजवळ दिसला. पोलिसांचं पथक गंगा कालव्यात शोध मोहीम देखील राबवत आहे आणि अनेक बाजूंनी तपास करत आहे.
मोहसीनचे वडील सईद कंत्राटदार आहेत आणि त्यांना नऊ मुलं आहेत, त्यापैकी मोहसीन सर्वात लहान आहे. कुटुंबाने सांगितलं की, लग्न दोन्ही कुटुंबांच्या संमतीने झालं होतं. मुलगा आणि मुलगी दोघेही आनंदी होते. नवरदेव अचानक बेपत्ता झाल्यामुळे संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. मोहसीनबद्दलचे पुरावे मिळावेत यासाठी पोलीस जवळच्या सीसीटीव्ही कॅमेरे देखील तपासत आहेत.