ढोलकी वाजवणाऱ्याने पुरूष डान्सरला सर्जरीने मुलगी बनवलं, मग त्याचे लाखो रूपये घेऊन झाला फरार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 12:43 PM2021-10-23T12:43:49+5:302021-10-23T12:46:06+5:30

UP Crime News : काही महिने त्याला पत्नीसारख सोबत ठेवलं आणि नंतर डान्सरची सगळी कमाई, दागिने घेऊन फरार झाला.

UP : Gorakhpur man gender changed dancer shocking case | ढोलकी वाजवणाऱ्याने पुरूष डान्सरला सर्जरीने मुलगी बनवलं, मग त्याचे लाखो रूपये घेऊन झाला फरार

ढोलकी वाजवणाऱ्याने पुरूष डान्सरला सर्जरीने मुलगी बनवलं, मग त्याचे लाखो रूपये घेऊन झाला फरार

Next

उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमधून फसवणुकीची एक फारच धक्कादायक घटना समोर आली आहे. डान्स पार्टीमध्ये ढोलक वाजवणाऱ्या एका व्यक्तीने विवाहित पुरूष डान्सरला फसवून सर्जरी करून महिला बनवलं. काही महिने त्याला पत्नीसारख सोबत ठेवलं आणि नंतर डान्सरची सगळी कमाई, दागिने घेऊन फरार झाला. पीडितने पोलिसात तक्रार दाखल केली असून चौकशी सुरू आहे.

गोरखपूरच्या गोला भागात राहणाऱ्या आरोपी विरोधात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पीडितने तक्रारीत सांगितलं की, आम्ही विवाहित आहोत आणि त्यांना मूलही आहे. तो गोला बाजारच्या डीजेमध्ये डान्सर होता. जून २०२० मध्ये त्याची भेट मो.मुमताजसोबत झाली. मुमताज ढोलक वाजवत होता. मुमताज त्याला म्हणाला की,  तुला इथे डान्स करण्याच १०० ते २०० रूपये मिळतात. दिल्लीत हेच तुला ५०० ते १००० रूपये मिळतील. तू माझ्यासोबत दिल्लीला चल. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तो नोव्हेंबर २०२० मध्ये दिल्लीला गेला.

त्यानंतर पीडितने सांगितलं की, आरोपीने त्याला काहीतरी खायला दिलं आणि त्यानंतर तो बेशुद्ध पडला. नंतर आरोपीने मोठ्या हुशारीने त्याची सर्जरी केली. या सर्जरीमुळे तो पुरूषाचा महिला बनला. डान्सरने विरोध केला तर मुमताज म्हणाला की, आता काहीच होऊ शकत नाही. दिल्लीत काही दिवस राहिल्यानंतर मुमताज त्याला घेऊन पुन्हा गोरखपूरमध्ये आला. इथे तो स्वत: ढोलकी वाजवायचा आणि त्याला डान्स करायला लावायचा. जे काही पैसे मिळत होते ते सगळे मुमताज आपल्याकडेच ठेवत होता.

डान्सरनुसार मुमताज सांगत होता की, तो अविवाहित आहे. आपण दोघे पती-पत्नीसारखे राहून पैसे कमावू. पण नंतर ३ ऑक्टोबरला मुमताज त्याला आपल्या गावी भरवलियाला घेऊन गेला. तिथे डान्सरला समजलं की, मुमताज विवाहित आहे आणि त्याला मुलही आहेत. याचा त्याला धक्का बसला. त्याने पोलिसात तक्रार देण्याचा विषय काढला तर मुमताज त्याला जीवे मारण्याची धमकी दिली.

१० लाख कॅश, चार लाखाचे दागिने घेऊन फरार

डान्सरचा आरोप आहे की, त्या रात्री तो त्याच्याच घरी झोपला. सकाळी समजलं की, त्याच्या बॅगमध्ये ठेवलेले दहा लाख रूपये आणि चार लाख रूपयांचे दागिने गायब होते. त्यानंतर पीडितने पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली आणि आरोपीचा शोध घेत आहेत.
 

Web Title: UP : Gorakhpur man gender changed dancer shocking case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.