प्रियकराच्या त्रासाला कंटाळली प्रेयसी, दारूतून दिल्या झोपेच्या गोळ्या अन् ओढणीने आवळला गळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 21:49 IST2022-01-07T21:49:18+5:302022-01-07T21:49:40+5:30
Murder Case : कटानुसार स्वप्नाने शिवमला बोलावलं आणि आपल्या मित्र-मैत्रिणींसह ओढणीने त्याचा गळा आवळून हत्या केली.

प्रियकराच्या त्रासाला कंटाळली प्रेयसी, दारूतून दिल्या झोपेच्या गोळ्या अन् ओढणीने आवळला गळा
लखनऊ - उत्तर प्रदेशातील कन्नोज जिल्ह्यात हत्याचा एक अनोखा प्रकार उघडकीस आला आहे. येथे एका प्रेयसीने आपल्या साथीदारांसह मिळून प्रियकराची हत्या केली. हत्येचं गूढ ठेवण्यासाठी मृतदेह एका खड्ड्यात दफन केला. पोलिसांकडून या प्रकरणात गांभीर्याने तपास सुरू आहे. याशिवाय प्रेयसी आणि तिच्या साथीदारांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
मृत तरुण काही दिवसांपूर्वी आपल्या मित्रांसह राजापूर गावात आला होता. तेव्हापासून तो बेपत्ता झाला होता. यानंतर कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. ही घटना सकोली गावातील आहे. येथे राहणारा शिवमचे गावातील एका महिलेसोबत प्रेम प्रकरण सुरू होतं. शिवम ३ जानेवारी रोजी ४ वाजताच्या सुमारास शेजारील गावात मित्रांसह गेला होता. नंतर तो बेपत्ता झाला होता. पोलिसांनी या प्रकरणात शिवमच्या मित्रांशी संवाद साधला त्यावेळी त्याचं प्रेम प्रकरण सुरू असल्याचं माहिती मिळाली.
पोलिसांनी सांगितलं की, मृत शिवमचे शेजारी राहणाऱ्या स्वप्ना हिच्यासोबत प्रेम प्रकरण सुरू होतं. स्वप्ना माहेरी मलिकपूर येथे राहत होती. येथे त्याचं येणं-जाणं होतं. एका मुद्द्यावरुन दोघांमध्ये वाद निर्माण झाला. यानंतर स्वप्ना आपल्या काही मित्रांसह शिवमलाही सोबत घेऊन गेली. येथे प्रेयसीने शिवमच्या त्रासापासून मुक्त होण्यासाठी आपल्याच ओढणीने त्याचा गळा दाबून हत्या केली. कटानुसार स्वप्नाने शिवमला बोलावलं आणि आपल्या मित्र-मैत्रिणींसह ओढणीने त्याचा गळा आवळून हत्या केली. यानंतर शिवमचा मृतदेह जमिनीत पुरण्यात आला. स्वप्नाने आपला गुन्हा कबुल केला आहे. हत्यापूर्वी तिने शिवमला खूप दारू पाजली आणि दारूत झोपेच्या गोळ्या मिश्रित केल्या होत्या. त्यानंतर ओढणीने त्याचा गळा आवळून हत्या केली.