गाझियाबादमधील इंदिरापुरम येथील एका उंच इमारतीवरून उडी मारून जीवन संपवणाऱ्या तीन बहिणींच्या प्रकरणात त्यांचे वडील चेतन गुर्जर यांचं नवीन विधान समोर आलं आहे. त्यांच्यावर असलेल्या कर्जाच्या आरोपांदरम्यान वडिलांनी आपल्या मुलींच्या 'कोरियन कल्चर'बद्दलच्या धोकादायक आवडीला या घटनेसाठी जबाबदार धरलं आहे. चेतन गुर्जर यांनी सांगितलं की, "मी गेल्या तीन महिन्यांपासून मुलींना समजावण्याचा प्रयत्न करत होतो, पण त्यांना याचं प्रचंड व्यसन जडलं होतं." गेल्या अनेक महिन्यांपासून घरात कोरियन कल्चरवरून तणावाचं वातावरण होतं असंही त्यांनी नमूद केलं.
मुलींचा कोरियाला जाण्याचा हट्ट
वडिलांच्या म्हणण्यानुसार, तिन्ही मुली कोरियन कल्चरच्या इतक्या आहारी गेल्या होत्या की, आम्हाला कोरियाला घेऊन चला, आम्हाला तिथल्या शाळेत जायचं आहे. भारतातील शाळेत जाणार नाही. हाच एक ध्यास त्यांनी धरला होता. त्या पूर्णपणे कोरियन चित्रपट, संगीत आणि जीवनशैलीच्या प्रभावाखाली होत्या. या व्यसनाची पातळी इतकी टोकाची होती की, जेव्हा जेव्हा त्यांच्याकडून मोबाईल काढून घेतला जाई, तेव्हा त्या अन्नपाणी सोडून देत असत. मुलींनी स्वतःला एका आभासी जगात कैद करून घेतलं होतं.
"तुम्ही आम्हाला कोरियन कल्चरपासून..."; ३ बहिणींनी शेवटच्या 'नोट'मध्ये काय लिहिलं?
ना गेम, ना टास्क... ३ बहिणींच्या मृत्यू प्रकरणी वडिलांचा 'तो' दावा खोटा? पोलिसांना वेगळाच संशय
त्या रात्री नेमकं काय घडलं?
चेतन यांनी खुलासा केला की, ज्या रात्री मुलींनी हे टोकाचं पाऊल उचललं, त्या रात्री १२ वाजेपर्यंत त्या मोबाईल पाहत होत्या. त्या आपल्या 'K-World' मधून बाहेर येण्यास तयार नव्हत्या. चेतन यांनी आपल्यावरील कर्जामुळे मुलींनी आत्महत्या केल्याचे दावे पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. त्यांनी स्पष्ट केलं की, "माझ्या कर्जाचा मुलींच्या आत्महत्येशी कोणताही संबंध नाही. त्यांच्या मृत्यूचे एकमेव कारण हे कोरियन कल्चर आहे, ज्याने त्यांचे विचार पूर्णपणे बदलून टाकले होते."
"प्लीज, आपल्या मुलांना गेम खेळू देऊ नका...", ३ लेकी गमावलेला बाप खचला, ढसाढसा रडला
जीवघेणा 'कोरियन लव्हर' गेम! प्राची बनली 'डेथ कमांडर'; फोनमध्ये दडलंय 'शेवटच्या टास्क'चं रहस्य
"कोरियन कल्चरवर बंदी घाला"
आपल्या तीन मुली गमावल्यानंतर खचलेल्या वडिलांनी सरकारकडे मागणी केली आहे की, या कोरियन कल्चरशी संबंधित सर्व आशयावर (Content) तातडीने बंदी घालण्यात यावी. "आज माझ्या तीन मुली गेल्या आहेत, उद्या कोणा दुसऱ्याच्या जाऊ नयेत. हे व्यसन मुलांना वाळवीसारखं पोखरत आहे" असं चेतन यांनी म्हटलं. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
Web Summary : Father claims daughters were obsessed with Korean culture, demanding to live and study in Korea. He denies debt caused their suicide, attributing it solely to Korean culture's influence and requests ban on it.
Web Summary : पिता का दावा है कि बेटियां कोरियाई संस्कृति से ग्रस्त थीं, कोरिया में रहने और पढ़ने की मांग कर रही थीं। उन्होंने कर्ज के कारण आत्महत्या करने से इनकार किया, केवल कोरियाई संस्कृति के प्रभाव को जिम्मेदार ठहराया और इस पर प्रतिबंध लगाने का अनुरोध किया।