Shocking: अमेरिकेत घडलं भयंकर कांड! पतीकडून पत्नीसह ४ नातेवाईकांची हत्या, मुलांनी कपाटात लपून वाचवला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 12:49 IST2026-01-24T12:46:28+5:302026-01-24T12:49:18+5:30

America Georgia Shooting News: अमेरिकेतील जॉर्जिया राज्यातून माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. एका भारतीय वंशाच्या व्यक्तीने कौटुंबिक वादातून आपल्या पत्नीसह ४ नातेवाईकांची हत्या केली.

Georgia Horror: Indian-Origin Man Shoots Wife and 3 Relatives Dead After Family | Shocking: अमेरिकेत घडलं भयंकर कांड! पतीकडून पत्नीसह ४ नातेवाईकांची हत्या, मुलांनी कपाटात लपून वाचवला जीव

Shocking: अमेरिकेत घडलं भयंकर कांड! पतीकडून पत्नीसह ४ नातेवाईकांची हत्या, मुलांनी कपाटात लपून वाचवला जीव

अमेरिकेतील जॉर्जिया येथे कौटुंबिक वादातून एका व्यक्तीने आपल्या पत्नीसह चार नातेवाईकांची गोळ्या झाडून हत्या केली. ही घटना शुक्रवारी पहाटे घडली. घटनेच्या वेळी घरात उपस्थित असलेल्या लहान मुलांनी कपाटात लपून आपला जीव वाचवला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ब्रूक आयव्ही कोर्ट परिसरात शुक्रवारी पहाटे २:३० च्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय कुमारचे आपल्या पत्नीसोबत सुरुवातीला अटलांटा येथील घरी भांडण झाले होते. त्यानंतर तो आपल्या मुलांसह ब्रूक आयव्ही कोर्ट येथील नातेवाईकांच्या घरी पोहोचला. तिथे हा वाद इतका विकोपाला गेला की, विजयने रागाच्या भरात अंदाधुंद गोळीबार सुरू केला. या गोळीबारात विजयची पत्नी आणि चार नातेवाईकांचा मृत्यू झाला.

मीमू डोगरा (वय- ४३, विजयची पत्नी), गौरव कुमार (वय-३३, नातेवाईक), निधी चंदर (वय-३७, नातेवाईक), हरीश चंदर (वय- ३८, नातेवाईक), अशी मृतांची ओळख पटली आहे. महत्त्वाचे म्हणजे, गोळीबार सुरू झाला, तेव्हा घरात तीन लहान मुले उपस्थित होती. या मुलांनी प्रसंगावधान दाखवत कपाटात लपून बसले. विजय कुमारच्या १२ वर्षांच्या मुलाने अत्यंत धाडसाने कपाटातूनच ९११ क्रमांकावर कॉल करून पोलिसांना माहिती दिली. या माहितीमुळे पोलीस अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी पोहोचले. सुदैवाने, मुलांना कोणतीही इजा झाली नाही, त्यांना सध्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

घटनेनंतर विजय कुमार घटनास्थळावरून फरार झाला होता. पोलिसांनी के-९ युनिटच्या (श्वान पथक) मदतीने शोधमोहीम राबवली. त्याचे वाहन रस्त्यावर बेवारस अवस्थेत आढळले, त्यानंतर जवळच्याच एका जंगल परिसरातून पोलिसांनी विजय कुमारला अटक केली. अटलांटा येथील भारतीय दूतावासाने या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले.

Web Title : जॉर्जिया हत्याकांड: पति ने पत्नी, 4 रिश्तेदारों की हत्या की; बच्चों ने छिपकर जान बचाई

Web Summary : जॉर्जिया में एक व्यक्ति ने घरेलू विवाद के बाद अपनी पत्नी और चार रिश्तेदारों की हत्या कर दी। बच्चे अलमारी में छिप गए और 911 पर कॉल करके खुद को बचाया। आरोपी हिरासत में है, जांच जारी है।

Web Title : Georgia Massacre: Man Kills Wife, 4 Relatives; Children Hide to Survive

Web Summary : In Georgia, a man killed his wife and four relatives following a domestic dispute. Children hid in a closet and called 911, saving themselves. The suspect is in custody, and investigation is ongoing.