एक गॅंगस्टरवर प्रेम करणं एका तरूणीला इतकं महागात पडलं की, तिला दोन महिने आठ दिवस तरूंगात घालवावे लागले. मात्र, वकिलाने जेव्हा कोर्टात सांगितले की, ती नकळत गॅंगस्टरच्या प्रेमात पडली तर तिला जामीन मिळाला. गॅंगस्टर पपला गुर्जरची गर्लफ्रेन्ड जियाला बुधवारी सायंकाळी अलवर सेंट्रल तुरूंगातून सोडण्यात आलं. तुरूंगातून बाहेर आल्यावर ती आपल्या वडिलांना बघून जोरजोरात रडू लागली होती. जियाला दोन महिने आठ दिवस तुरूंगात रहावं लागलं. नंतर ती निर्दोष असल्याचे आढळल्यावर तिला सोडण्यात आलं.

तुरूंगातून बाहेर आल्यावर जियाने सांगितले की, पपलाने तिला सांगितले होते की, तो दिल्लीचा राहणारा आहे आणि बिझनेस करतो. लॉकडाऊनमुळे तो फसला आहे. काही दिवस जिममध्येच त्यांच्यातील बोलणं वाढलं. एक दिवस त्याने मला स्वत:चा जिम सुरू करण्याचा सल्ला दिला. पपला म्हणाला की, तो पैशांची व्यवस्था करेल. यानंतर त्यांच्यातील जवळीकता वाढली होती आणि दोघे प्रेमात पडले. त्यासोबतच जियाने सांगितले की, तिचा पपलाशी काहीही संबंध नाही आणि कधी त्याने तिच्या अकाउंटवर कोणतेही पैसे ट्रान्सफर केले नाही. (हे पण वाचा : पाकिस्तानी तरूणाच्या प्रेमात पडली भारतीय विवाहित महिला, बॉर्डर पार करताना तिला सैनिकांनी पकडलं!)

जियाचे वडील चांद सिकलगर डॉक्टर आहेत आणि आई हाउसवाईफ आहे. जियाला दोन बहिणी आहेत. जियाचं २०१४ मध्ये भोपाळमधील एका नवाब परिवारात लग्न झालं होतं. तिने सांगितले की, तिच्या पतीचं दुसऱ्या तरूणीसोबत अफेअर होतं. ज्यामुळे तिने घटस्फोट घेतला. आता तिचं लग्न घरातील लोक ठरवतील.

जियाने सांगितले की, जेव्हा गॅंगस्टर पपला गुर्जरची भेट झाली तेव्हा त्याने त्याचं नाव मानसिंह पुत्र हरीश चंद्र यादव सांगितलं होतं. तो दिल्लीच्या छतरपूरचा राहणारा असल्याचं तो बोलला होता. पतीसोबत घटस्फोट झाल्यावर जिया महाराष्ट्रातील कोल्हापूरमधील एनएमए मार्शल आर्ट जिममध्ये ट्रेनर होती. तिथे पपला गुर्जरने तिला सांगितले होते की, तो लॉकडाऊनमुळे घरी जाऊ शकत नाहीये. त्यामुळे पपला तिच्यासोबत राहू लागला. जिया म्हणाली की, पपला गुर्जर फारच फारच धार्मिक आणि सात्विक प्रवृत्तीचा होता. सकाळी आणि सायंकाळी तो देवाची पूजा करायचा. जिया मांसाहारी होती आणि तो शाकाहारी. त्यामुळे पपला गुर्जर जियापासून काही अंतर ठेवून राहत होता.

२८ जानेवारीला कोल्हापूरमध्ये पपला आणि जियाला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर आधी ७ दिवस पोलीस कस्टडीमध्ये त्यांना ठेवलं. ४ फेब्रुवारीला त्यांना कोर्टात हजर केलं. त्यानंतर जिया २ महिने ४ दिवस तुरूंगात राहिली. जियाचे वकिल अंकित गर्ग म्हणाले की, हायकोर्टातून जामिनही याच आधारावर मिळाला आहे की, कुणी नकळत कुणासोबत राहत असेल तर तो गुन्हेगार कसा असू शकतो? जियाला माहीत नव्हतं की, पपला गुर्जर एक गॅंगस्टर आहे. त्याने तो बिझनेसमन असल्याचं सांगितलं होतं. (हे पण वाचा : आई की वैरीण! अनैतिक संबंधात अडथळा ठरत असलेल्या चिमुकलीची आईकडून हत्या, मृतदेह विहिरीत फेकला!)

वकिलांनुसार, जिया कोल्हापूरमध्ये जिम ट्रेनर होती आणि ३० ते ३५ हजार रूपये कमावत होती. पपला गुर्जरही त्याच जिममध्ये जात होता. १३ डिसेंबरला दोघांची भेट झाली होती. दोघांमध्ये जवळीकता वाढली. पपलाने तिला सांगितले की, तो बिझनेससाठी इथे आला आहे. सध्या लॉकडाऊनमुळे तिथे थांबला आहे. यादरम्यान जिया त्याच्या प्रेमात अडकत गेली.

जियाच्या संपर्कात येण्यापूर्वी पपलाने भरतपूरच्या एका व्यक्तीच्या नावाने फेक आधार कार्ड बनवलं होतं. हे कागदपत्र त्याने घरमालकाला दिले होते. त्यामुळे जियाने आधार कार्ड बनवलं हा आरोप चुकीचा आहे. त्याने त्याचं नाव मान सिंह सांगितलं होतं. मान सिंह नाव रॉयल फॅमिलीसारखं आहे. त्या हिशेबानेच त्याने असं नाव सांगितलं होतं.
 

Web Title: Gangster Papla Gujjar girlfriend Jia gym trainers Rajasthan high court granted bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.