Indian girl try to cross pakistani border to meet his pakistani boyfriend | पाकिस्तानी तरूणाच्या प्रेमात पडली भारतीय विवाहित महिला, बॉर्डर पार करताना तिला सैनिकांनी पकडलं!

पाकिस्तानी तरूणाच्या प्रेमात पडली भारतीय विवाहित महिला, बॉर्डर पार करताना तिला सैनिकांनी पकडलं!

प्रेमाच्या वेगवेगळ्या घटना नेहमीच समोर येत असतात. अशीच एक प्रेमकहाणी समोर आली आहे. भारतातील एक महिला सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानातील तरूणाच्या प्रेमात पडली. इतकेच काय तर ती आपलं घर-लोक सोडून पाकिस्तान जाण्यासाठी पंजाबच्या डेरा बाबा नानक येथील करतापूर कॉरिडोरला पोहोचली. २५ वर्षीय ही तरूणी विवाहित आहे. ओडिशाची राहणारी आहे. इतकेच नाही तर तिला एक पाच वर्षाची मुलगीही आहे. बीएसएफने या तरूणीला बॉर्डरवर फिरताना पाहिलं. नंतर तिला पोलिसांकडे सोपवलं.

याप्रकरणी डीएसपी कंवलप्रीत सिंह आणि एसएचओ अनिल पवार यांनी सांगितले की, ही तरूणी ओडिशाची राहणारी आहे. तिचं वय २५ वर्षे आहे. सहा वर्षाआधी तिचं लग्न झालं होतं आणि तिला पाच वर्षाची मुलगीही आहे. ही तरूणी गेल्या दोन महिन्यांपासून आपल्या माहेरी राहत होती.

पोलिसांनी सांगितले की, साधारण दोन वर्षाआधी या तरूणीने तिच्या मोबाइलवर आझाद नावाचं एक अॅप डाऊनलोड केलं होत. त्यावरून एका तरूणासोबत चॅट करू लागली. दरम्यान मोहम्मद मान नावाच्या या तरूणासोबत तिची मैत्री झाली आणि दोघांनी एकमेकांना आपले व्हॉट्सअॅर नंबर दिले. नंतर तरूणाने तिला करतारपूर कॉरिडोरमधून पाकिस्तानातून येण्यास सांगितले. ती यासाठी तयारही झाली.

ही तरूणी ओडिशाहून विमानाने दिल्लीला आली. नंतर बसने अमृतसरला पोहोचली आणि पाच एप्रिलला गुरूद्वारा श्री हरिमंदर सहाब अमृतसर येथे राहिली. नंतर ६ एप्रिलला डेरा बाब नानकला पोहोचली. डीएसपी कंवलप्रीत सिंहने पुढे सांगितले की, ही तरूणी ऑटोने डेरा बाबा नानकला पोहोचली. जिथे बीएसएफने तिला हे सांगून परत पाठवले की, कोरोनामुळे करतारपूर कॉरिडोर बंद आहे. आणि विना पासपोर्ट पाकिस्तानला जाता येणार नाही.

त्यानंतर बीएसएफने तरूणीला डेरा बाबा पोलिसांकडे सोपवलं. चौकशीनंतर समोर आलं की, तरूणी तिच्यासोबत साठ ग्रॅम सोन्याचे दागिने आणले होते. त्यानंतर पंजाब पोलिसांकडून ओडिशामध्ये संबंधित पोलीस स्टेशनमध्ये संपर्क केला गेला. तिथे समजलं की, तरूणीच्या पतीने ती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे. पोलिसांनी तरूणीच्या घरच्या लोकांना बोलवलं आणि दागिन्यांसोबत तिला त्यांच्याकडे सोपवलं. 
 

Web Title: Indian girl try to cross pakistani border to meet his pakistani boyfriend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.