शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मैत्रिणीवरील विश्वास नडला; प्लॅन बनवून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार घडवून आणला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 19:15 IST

बलात्कार आणि त्यांना मदत केल्याच्या आरोपाखाली सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर तीन आरोपी फरार आहेत.

ठळक मुद्देपीडित मुलगी मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील असून ती देवास येथील मावशीच्या घरी राहून शिक्षण घेत आहे.अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अमन, नितेश, लोकेश लाल (३५) आणि तीन अल्पवयीन मुलींचा समावेश असून पीडित मुलीची अल्पवयीन मैत्रीण आणि दोन हॉटेल कामगार यांचा समावेश आहे.

मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यात एका १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात पीडित मुलीच्या अल्पवयीन मैत्रिणीने आरोपींना मदत केली. बलात्कार आणि आरोपींना मदत केल्याच्या आरोपाखाली सहा आरोपींना पोलिसांनीअटक केली आहे. तर तीन आरोपी फरार आहेत.देवास जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कृष्णा वेणी देसावती यांनी रविवारी माहिती दिली की, एका १३ वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात आरोपींना मदत करणार्‍या अल्पवयीन मुलीसह सहा आरोपींना रविवारी अटक करण्यात आली. अन्य तीन आरोपी अद्याप फरार आहेत, त्यांचा शोध सुरू आहे. पुढे ते म्हणाले की, पीडित मुलीचे आरोपींनी तिच्या अल्पवयीन मैत्रिणीच्या मदतीने १५ जूनला देवास रेल्वे स्थानकातून अपहरण केले होते. १६ जून रोजी पीडित मुलीच्या वडिलांनी कोतवाली देवास पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पीडित मुलगी मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील असून ती देवास येथे मावशीच्या घरी राहून शिक्षण घेत आहे. त्यांनी पुढे सांगितले की, मैत्रिण तिला तिच्या अ‍ॅक्टिव्हावर बसवून देवास रेल्वे स्टेशनहून शहरातील हॉटेलमध्ये घेऊन गेली आणि हॉटेलच्या रिसेप्शनिस्टने विना ओळखपत्र रूम बुक केली, तिथे आरोपी रोहित खटीक (२३), अजय खटीक ( २०) आणि विशाल गोस्वामीने तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.आरोपींनी नंतर पीडित मुलीला त्याच्या इतर दोन साथीदार अमन खटीक (१८) आणि नितेश तिवारी (१९) यांच्याकडे दिले. या दोघांनीही पीडित मुलीवर बलात्कार करून तिला चित्तोडगढ़ आणि राजस्थानच्या जयपूर येथे आणले. नंतर जयपूर गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या मदतीने हे दोन्ही आरोपी आणि पीडित मुलगी ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणातील आरोपींविरोधात भा. दं. वि. कलम ३७६, ३६८ आणि पॉक्सो कायदा तसेच अनुसूचित जाती व जमाती कायद्यान्वये गुन्हा नोंदवून सखोल चौकशी सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अमन, नितेश, लोकेश लाल (३५) आणि तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. पीडित मुलीची अल्पवयीन मैत्रीण आणि दोन हॉटेल कामगार यांचा देखील समावेश आहे. तसेच आरोपी रोहित, अजय आणि विशाल फरार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. या आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस अधीक्षक देवासद्वारे पोलीस पथकाला दहा हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. अशी माहिती अमर उजालाला देण्यात आली आहे. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

Sushant Singh Rajput Suicide : सलमान, करण जोहरसह ५ जणांविरोधातील खटल्याला कोर्टाची मंजुरी, ३० जूनला नोंदवली जाणार साक्ष

 

धक्कादायक घटना! मंदिरातील 3 साधूंनी केला एका महिलेवर ७ वेळा बलात्कार

 

तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणाने ISI च्या छुप्या कारवायांची माहिती मिळेल : विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम

 

पतीच अब्रूशी खेळला! पत्नीला फसवून निर्जनस्थळी नेले अन् घडवून आणली लज्जास्पद घटना  

 

Unlock1 : पत्नीने वेळ साधली! पती क्वारंटाईन होताच प्रियकरासोबत 'छू मंतर' झाली

 

६ खोल्या, ३५० कैदी अन् ३ शौचालये; तिहारमधून तळोजा जेलमध्ये पाठवलेल्या नवलखा यांनी उघड केली आपबिती

 

 

धक्कादायक! प्रहार यवतमाळ शहर अध्यक्षाची आत्महत्या  

टॅग्स :Gang Rapeसामूहिक बलात्कारPoliceपोलिसMadhya Pradeshमध्य प्रदेशArrestअटकPOCSO Actपॉक्सो कायदा