शहरं
Join us  
Trending Stories
1
साखर निर्यातीला 'ब्रेक'! देशातील भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय; जागतिक बाजारपेठेत संकटाची भीती
2
CNG Price Hike: महागाईचा झटका! मुंबईत सीएनजीची दरवाढ, पाहा काय आहे नवी किंमत?
3
आजचे राशीभविष्य - १४ मे २०२६, अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, उत्पन्नात व व्यापार-व्यवसायात वाढ होईल
4
इमरान खान यांच्या पहिल्या पत्नी जेमिमा अब्जाधीश गुंतवणूकदारासोबत रिलेशनशिपमध्ये
5
मोठी बातमी! LPG आणणाऱ्या 'एमव्ही सनशाईन' जहाजाने पार केले होर्मुझ, नौदलाचे कडेकोट संरक्षण
6
भरघोस पगारासह देशसेवेची संधी! भारतीय वायुसेनेची भरती जाहीर; जाणून घ्या महत्वाच्या तारखा...
7
Gold Rate Prediction: सोने तब्बल २७ हजारांनी महाग होणार; डॉलर वाचविण्यासाठी केंद्र सरकारचा ‘सोन्या’वर घाव
8
'नीट'ला नाट : पेपरफुटीप्रकरणी सीबीआयचे छापे, ५ जणांना अटक; डॉक्टरांची संघटना एनटीएविरोधात सर्वोच्च न्यायालयात
9
अग्रलेख: सोने घ्यावे की न घ्यावे? निर्णय घेण्याची वेळ आली आहे
10
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील युवकांना एटीएसने घेतले ताब्यात; ५७ जण रडारवर
11
Gold Silver Rate:आयात शुल्कवाढीचा झटका; सोने ८ हजार रुपये, तर चांदी २० हजारांनी महागली
12
Mhada Lottery 2026: म्हाडा घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ; आता कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करता येणार? 
13
विशेष लेख: पावसाचा अंदाज सुधारण्याची शक्यता आहे!
14
11th admission: अकरावी प्रवेशावेळी तांत्रिक अडचणी, शेकडो पालक-विद्यार्थ्यांना मनस्ताप
15
संकट दारात उभे; पण कोणाकडेही उत्तर नाही; उद्योगपती उदय कोटक यांचा भारतीयांना धोक्याचा इशारा
16
Sindhudurg: ‘ती’ अखेरची क्लिक ठरली जीवघेणी; हसत्या-खेळत्या तिघींचा धरणात करुण अंत!
17
लेख: बिनपैशाच्या बदल्या होऊ शकतात की नाही?
18
पीएम मोदींसह अनेक मंत्र्यांनी केली ताफ्यात 'काट'कसर; भाजपशासित मुख्यमंत्र्यांनीही केल्या अनेक उपाययोजना
19
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
20
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
Daily Top 2Weekly Top 5

फ्रान्सिस्को काव्र्हालो खून प्रकरण : दोन फरार संशयित अखेर जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2019 20:08 IST

हत्येच्या घटनेनंतर आठवडयानंतर हे दोघे संशयित पोलिसांना सापडले.

ठळक मुद्देदारुच्या नशेत झालेल्या भांडणातून हा खून झाला होता.अटक केलेले दोन्हीही संशयित या हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित आहेत.

मडगाव - गोव्यातील राय - मनोरा येथे फ्रानिस्को कुलासो (33) याचा खून करुन मुंबईत पळून गेलेला दोन संशयितांच्या आज गोवा पोलिसांनी मडगावात मुसक्या आवळल्या. जॉयल ग्रासा (24) व वोर्फिन कुलासो (22) यांना आज गुरुवारी सकाळी जेरबंद करण्यात आले. हत्येच्या घटनेनंतर आठवडयानंतर हे दोघे संशयित पोलिसांना सापडले. खून केल्यानंतर ते दोघेही मुंबईला पळून गेले होते. पोलिसांनी एक पथक मुंबईलाही पाठविले होते. संशयितांविरुध्द पोलिसांनी न्यायालयातून अजामीनपात्र अटक वॉरन्टही मिळविले होते. आज सकाळी मुंबईहून वरील संशयित गोव्यात आले असता, त्यांना मडगावात पोलिसांनी ताब्यात घेतले. नंतर त्यांना रितसर अटक करण्यात आल्याची माहिती मडगाव विभागाचे पोलीस उपअधिक्षक राजू राउत देसाई यांनी दिली. अटक केलेले दोन्हीही संशयित या हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित आहेत.
मागच्या गुरुवारी रात्री फ्रान्सिस्को याचा खून झाला होता. दारुच्या नशेत झालेल्या भांडणातून हा खून झाला होता. मयत फ्रान्सिस्को आरडाओरडा करत असल्यामुळे संतापलेल्या सहा युवकांनी त्याच्यावर फुटलेल्या बाटलीने हल्ला चढविला. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर मायणा - कुडतरी पोलिसांनी या खून प्रकरणाचा छडा लावताना रॉयन आल्वारिस (21), विल्टन कुतिन्हो (34), मेल्बर्न कुतिन्हो (22) रहाणारे सर्व नुवे व वालेन्सियो वाझ (26) शिरोडा या चौघांना अटक केली होती. मारामारीचा हा प्रकार राय - मनोरा येथे कार्लटन बारजवळ घडला होता. या बारमध्ये सर्व सहा संशयित दारु पित बसलेले असताना त्यापूर्वी आणखी दोन बारमध्ये जाऊन दारु पिऊन तर्र होऊन आलेला फ्रान्सिस्को या बारमध्ये येऊन दारुसाठी मोठमोठय़ाने दंगा करु लागला. त्यामुळे संशयित खवळले. त्यांची मयताकडे बाचाबाची झाली त्यानंतर रागाच्या भरात संशयितांनी त्याच्यावर फुटलेल्या बाटलीने वार केले होते. या मारहाणीने मयत बेशुद्ध होऊन पडला असता संशयितांनी त्याला आपल्या मोटरसायकलवर बसवून वाशे-लोटली येथे पुलाजवळ नेऊन टाकून दिले होता.
६ सप्टेंबर रोजी पोलिसांना बोरी पुलाच्या खाली मृतदेह असल्याचे कळविल्यानंतर पोलिसांनी तेथे जाऊन पहाणी केली असता मृताच्या अंगावर चार जखमा सापडल्याने पोलिसांनी अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा नोंद केला होता. कुठलाच सुगावा मिळत नसल्याने हा खून पोलिसांसाठी आव्हान बनले होते. या खूनाचा तपास करण्यासाठी उपअधीक्षक राजीव राऊत देसाई यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक प्रविणकुमार वस्त, संदेश चोडणकर, रवी देसाई, विल्सन डिसोझा, तुषार लोटलीकर, राहुल परब, सलीम शेख, पोलीस शिपाई अविनाश नाईक, सोमनाथ नाईक, अजय नाईक, विकास नाईक, विकास कौशिक व चेतन कोळी यांचे पथक तैनात केले होते. या पथकाने राय-मनोरा भागातील सर्व दारुची दुकाने पिंजून काढून माहिती गोळा केली होती. त्यात काल्र्टन बारमध्ये दंगा झाल्याचे त्यांना कळून चुकल्यानंतर त्यांनी संशयितांच्या मुसक्या आवळल्या.
जॉयल ग्रासा व वोर्फिन कुलासो हे फरार झाले होते. जॉयल हा वीज खात्यात कंत्रटी कामगार म्हणून करत होता तर वोर्फिन हा परदेशात कामाला होता अशी माहिती पोलिसांनी दिली. भारतीय दंड संहितेच्या 302 व 363 कलमाखाली त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, या खून प्रकरणात पुर्वी अटक केलेल्या चार संशयितांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने काल त्यांना न्यायालयात उभे केले असता, आठ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. मायणा - कुडतरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील पोलीस तपास चालू आहे.

 

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसgoaगोवाMurderखूनCrime Newsगुन्हेगारी