खळबळजनक! चार वर्षीय चिमुकलीवर चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 08:22 PM2020-09-04T20:22:04+5:302020-09-04T20:24:50+5:30

 गुरुवारी दुपारी चिमुकली घराबाहेर अंगणात खेळत होती.

Four-year-old girl sexually abused after being lured to give her chocolate | खळबळजनक! चार वर्षीय चिमुकलीवर चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार

खळबळजनक! चार वर्षीय चिमुकलीवर चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार

Next
ठळक मुद्देभंडारा जिल्ह्यातील पिपराची घटना पोलिसांनी त्या विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले.

तुमसर (भंडारा)-- एका चार वर्षीय चिमुकलीवर गावातीलच 16 वर्षीय विधिसंघर्षग्रस्त बालकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना तुमसरलगतच्या पिपरा येथे शुक्रवारी उघडकीस आली.


 गुरुवारी दुपारी चिमुकली घराबाहेर अंगणात खेळत होती. त्यावेळी १६ वर्षीय विधिसंघर्षग्रस्त बालकाने  चॉकलेट घेऊन देतोय म्हणून गावातील तलावाकडे घेवून गेला. तेथे त्या चिमुकलीवर अत्याचार केला. चिमुकली गंभीर जखमी झाली असता विधिसंघर्षग्रस्त बालकाने तिला तिथेच सोडून पळ काढला. दरम्यान कशी बशी घरी आल्यावर तिने आपल्या आईकडे आपबीती सांगितली. त्या मुलाला जाब विचारण्यासाठी त्याचा घरी गेले असता तो पसार झाला. शेवटी शुक्रवारी मुलीच्या आईवडिलांनी तुमसर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. त्यावरुन पोलिसांनी त्या विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले.

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

खळबळजनक! भाजपा पदाधिकाऱ्याच्या मुलाची चाकूने वार करून हत्या, हल्लेखोर फरार

 

सुशांतच्या चॅटमधून मोठा खुलासा, बहिणीने एंजाइटी-डिप्रेशनचे औषध घेण्यासाठी दिला होता सल्ला

 

Sushant Singh Rajput Case : रियाला शवगृहात जाण्यासाठी परवानगी दिलीच नव्हती, कूपर रुग्णालयाचा खुलासा

 

बापरे! ९० हजाराहून अधिक तरुणांनी २०१९ मध्ये केली आत्महत्या, पहा NCRB चा अहवाल

Web Title: Four-year-old girl sexually abused after being lured to give her chocolate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.