खळबळजनक! भाजपाच्या माजी जिल्हा उपाध्यक्षाची गोळ्या घालून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 18:01 IST2019-10-09T17:59:53+5:302019-10-09T18:01:27+5:30
उत्तर प्रदेशातील तलहेदी खुर्द येथे ही घटना घडली.

खळबळजनक! भाजपाच्या माजी जिल्हा उपाध्यक्षाची गोळ्या घालून हत्या
सहरानपुर – मोटारसायकलवरुन जाणाऱ्या भाजपा किसान मोर्चाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष चौधरी यशपाल सिंह यांची हल्लेखोरांनी पाठलाग करुन हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर हल्लेखोर त्यांच्याजवळ गेले आणि पुन्हा खाली पडलेल्या चौधरींवर आणखी गोळ्या झाडल्या. उत्तर प्रदेशातील तलहेदी खुर्द येथे ही घटना घडली.
चौधरी यांनी शेतकऱ्यांच्या अनेक मागण्यांसाठी आंदोलनं केली. त्यांचा वीटभट्टीचा व्यवसाय असून ते मिरगपूर येथून मोटारसायकलने जात असताना अज्ञात दोनजणांना त्यांच्या पाठलाग केला. दोघांपैकी एकाने पाठीमागून चौधरी यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर चौधरी जखमी होऊन खाली पडले. तेव्हा हल्लेखोरांनी चौधरी यांच्याजवळ जाऊन पुन्हा गोळ्या झाडल्या आणि फरार झाले. याची माहिती स्थानिक गावकऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. २००७ पासून चौधरी यांचा काही गावकऱ्यांशी वाद सुरु होता. त्याअनुषंगाने काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.