शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

दुबईत प्राध्यापक असूनही मुंबईत ड्रग्जची तस्करी करणाऱ्याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2021 05:55 IST

दीबा ओलिवर असे त्याचे नाव असून तो अंधेरीत एमडीएमएच्या एक्सटीसी पिल्स विक्री करीत होता. दुबईमध्ये एका महाविद्यालयात शिकवत असलेला ओलिवर हा कमिशनच्या हव्यासापोटी काही महिन्यांपासून ड्रग्ज पेडलर म्हणून काम करीत होता, अशी माहिती एनसीबीने दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कमिशनच्या हव्यासापोटी उच्चशिक्षित तरुणही मादक पदार्थांच्या विक्री व तस्करीत गुंतल्याची बाब अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) केलेल्या कारवाईमुळे समोर आली. दुबईत प्राध्यापक असलेल्या आणि मुंबईत ड्रग्ज तस्करी करणाऱ्या एका कॅमेरुन नागरिकाला अटक करून अमली पदार्थ जप्त केले.दीबा ओलिवर असे त्याचे नाव असून तो अंधेरीत एमडीएमएच्या एक्सटीसी पिल्स विक्री करीत होता. दुबईमध्ये एका महाविद्यालयात शिकवत असलेला ओलिवर हा कमिशनच्या हव्यासापोटी काही महिन्यांपासून ड्रग्ज पेडलर म्हणून काम करीत होता, अशी माहिती एनसीबीने दिली आहे.एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ओलिवर हा सुरुवातीला वैद्यकीय उपचारासाठीचा व्हिसा घेऊन भारतात आला होता. त्याला क्षयरोगाचा त्रास असल्याने त्याच्या उपचारासाठी तो मुंबईत आला. या दरम्यान त्याला पैशांची गरज असताना एका ड्रग्ज तस्कराच्या संपर्कात आला. कमिशन मिळू लागल्याने त्याने त्याची विक्री सुरू केली. त्याबाबत माहिती मिळाल्यानंतर पथकाने बुधवारी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.ड्रग्जची ऑर्डर मिळाल्यानंतर तो त्याच्या माणसाकडून घेऊन ऑटो किंवा टॅक्सीच्या माध्यमातून त्याची डिलिव्हरी करायचा. एनसीबीने दीबा याच्यासह मोहम्मद इमरान अन्सारी नावाच्या एका ड्रग्ज पेडलरलाहर अटक केली आहे. एनसीबी अन्सारीच्या घरी गेल्यानंतर त्याने त्याच्याकडील ड्रग्ज खिडकीतून खाली फेकून दिले. या कारवाईत एनसीबीने अन्सारीच्या घरातून साडेनऊ लाख रुपये जप्त केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

टॅग्स :Drugsअमली पदार्थ