शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

दोस्त दोस्त ना रहा..!   भांडणातून घेतला जीव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 06:23 IST

- सदानंद नाईक  लोकमत न्यूज नेटवर्क  उल्हासनगर : दिवसरात्र सोबत राहणाऱ्या मित्राने जुन्या भांडणाच्या रागातून नशेच्या आहारी गेलेल्या मित्राला संपविल्याची ...

- सदानंद नाईक लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : दिवसरात्र सोबत राहणाऱ्या मित्राने जुन्या भांडणाच्या रागातून नशेच्या आहारी गेलेल्या मित्राला संपविल्याची घटना ३ जुलैला उल्हासनगरच्या प्रेमनगर टेकडी परिसरात घडली. हिल लाइन पोलिसांनी आरोपीला काही तासांत अटक केली.

उल्हासनगर कॅम्प नं. ५ येथील अनिल रामचंदानी कांबळे हा प्रेमनगर टेकडी परिसरात राहत होता. तो नशेच्या आहारी गेल्याने, २० वर्षांपासून त्याची पत्नी मुलासह अंबरनाथमध्ये राहते; तर अनिल आई लक्ष्मीसोबत आनंदपुरी दरबार परिसरात राहतो. त्याच परिसरात राहणारा शकील खलील शेख हा त्याचा मित्र होता. दोघेही एकत्र काम करून, रात्री दारूपार्टी करायचे. अशाच एका पार्टीत दोघांचे कडाक्याचे भांडण झाले. या रागातून शकील याने अनिलचा खून केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल जगताप व तपास अधिकारी सिद्धेश्वर कैलासे यांनी दिली.

प्रेमनगरटेकडी येथे राहणारी बहीण सुरेखा काळपुंड हिच्याकडे ३ जुलैला सकाळी ११ वाजता अनिल गेला होता. तेथून तो कामावर  जातो म्हणून निघाला. रात्री ८ वाजता सुरेखाकडे आई आली आणि  अनिल घरी न आल्याने चिंता व्यक्त केली. 

रात्री १०:३० वाजता काही पोलिस घरी आले व त्यांनी एक फोटो दाखवीत ‘हा अनिल आहे का?’ अशी विचारणा केली. तेव्हा सर्वजण काळजीत पडले. काहीतरी वाईट घटना घडली असावी, अशी शंका अनिलच्या नातेवाईकांना आली. याच परिसरातील एका खोलीत अनिल रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. 

खून करून पळाला...अनिलची बहीण सुरेखाने शकीलच्या पत्नीकडे विचारणा केल्यावर, शकील घाबरून घरातून पळून गेल्याचे तिने सांगितले. शकीलने अनिलला लाकडी दांड्याने मारल्याचे उघड झाले. सुरेखाच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल केला. शकील व अनिल सोबत राहून मिळेल ते काम करीत होते. मात्र जुन्या भांडणातून मित्राने मित्राचा खून केल्याची माहिती तपास अधिकारी सिद्धेश्वर कैलासे यांनी दिली.