शहरं
Join us  
Trending Stories
1
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
2
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
3
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
4
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
5
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
6
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
7
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
8
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
9
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
10
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
11
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
12
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
13
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
14
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
15
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
16
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
17
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
18
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
19
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
Daily Top 2Weekly Top 5

राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 19:16 IST

माध्यमांसोबत बोलताना गोविंदने राज कुशवाह आणि सोनम यांच्यातील प्रेमसंबंधांच्या चर्चा फेटाळल्या आणि राज रक्षाबंधनाच्या दिवशी माझ्यासोबत बसूनच सोनमकडून राखी बांधायचा, असे सांगितले...

राजा रघुवंशी हत्याप्रकरणाने संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी, राजाची पत्नी सोनम आणि इतर चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, बुधवारी हत्येचा कट रचणाऱ्या सोनमचा भाऊ गोविंद अचानक राजाच्या कुटुंबाला भेटण्यासाठी त्याच्या घरी पोहोचला. यावेळी गोविंद राजाच्या आईला भेटला आणि सोनमच्या कृत्याबद्दल क्षमा मागितली आणि त्यांना मिठी मारत ढसाढसा रडला. या भेटीनंतर गोविंदने माध्यमांशी बोलताना, अनेक प्रश्नांची उत्तरं दिली.

माध्यमांसोबत बोलताना गोविंदने राज कुशवाह आणि सोनम यांच्यातील प्रेमसंबंधांच्या चर्चा फेटाळल्या आणि राज रक्षाबंधनाच्या दिवशी माझ्यासोबत बसूनच सोनमकडून राखी बांधायचा, असे सांगितले. याशिवया ती शिलाँगला गेली, हे आपल्याला माहीत नव्हते. ती आसाममधील गुवाहाटी येथे जाणार असल्याची माहिती होती, असेही गोविंदने सांगितले. यावेळी त्याने मेघालय सरकारवर केलेल्या आपल्या आरोपांबद्दल क्षमाही मागितली. तसेच, सोनम आणि राजने गुणा येथे कोर्ट मॅरेज करण्याचा प्रयत्न केल्याच्या चर्चाही नाकारल्या.

लग्नाची घाई का केली? -गोविंद म्हणाला, "आम्ही लग्नासंदर्भात कसल्याही प्रकारची घाई केली नाही. मात्र पुढच्या वर्षात कुठलेही मूहुर्त नव्हते. दोन वर्षांपर्यंत कुठलेही मुहूर्त नव्हते, यामुळे थोडी घाई झाली. घाई करण्याचे कारण म्हणजे, 11 मेरोजी शेवटची तारीख होती. त्यानंतर, यांना दोन वर्षांपर्यंत कुठलेही मूहुर्त नव्हते. 

राजासोबतच्या लग्नामुळे नाराज होती सोनम? -सोनम राजासोबतच्या लग्नामुळे नाराज होती? याप्रश्नाला उत्तर देताना गोविंद म्हणाला, साखरपुड्यानंतर, ती आनंदात होती आणि आमच्या घरात दोन महिने लग्नाची खरेदी सुरू होती. या घरात (राजाच्या घरी) लग्नाची खरेदी एक महिन्यानंतर सुरू झाली असली तरी, आमच्या घरी ही तयारी दोन महिन्यांपासूनच सुरू होती आणि ती अत्यंत आनंदी होती."

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMadhya Pradeshमध्य प्रदेश