शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

पळून जाणाऱ्या वाहनचोरास पोलिसांनी 'धूम' स्टाईलने पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2021 20:04 IST

Crime News : सिंहगड रस्ता पोलिसांची कामगिरी; पाच दुचाकी हस्तगत

ठळक मुद्देयाप्रकरणी साबीर इस्लामउद्दील अलम (वय: १९ वर्षे, रा. चव्हाण आळी, नऱ्हे, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या वाहनचोराचे नाव आहे.

धायरी: दुचाकी चोरणाऱ्या तरुणास सिंहगड रस्ता पोलिसांनीअटक केली आहे. त्याच्याकडून १ लाख ५० हजार रूपये किंमतीच्या पाच दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी साबीर इस्लामउद्दील अलम (वय: १९ वर्षे, रा. चव्हाण आळी, नऱ्हे, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या वाहनचोराचे नाव आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहनचोरीस प्रतिबंधात्मक उपयायोजना करण्यासाठी  तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी हे पेट्रोलिंग करुन संशयित वाहनांची तपासणी करीत होते. दरम्यान एक सराईत वाहनचोर सिंहगड रस्त्यावरील हॉटेल ब्रह्माजवळ चोरलेली दुचाकी घेऊन येणार असल्याचे तपास पथकातील पोलीस हवालदार आबा उत्तेकर यांना गुप्त बातमीदारांकडून समजले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी हॉटेल ब्रह्मा चौकामध्ये सापळा रचून ताब्यात घेतले असता त्याने याधीही पाच दुचाकी वाहने चोरल्याची कबुली दिली. सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद वाघमारे, सहायक पोलिस निरीक्षक चेतन थोरबोले, पोलीस उपनिरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस कर्मचारी मोहन भुरुक, आबा उत्तेकर, राजेश गोसावी, शंकर कुंभार,उजवल मोकाशी, सचिन माळवे, दयानंद तेलंगे - पाटील, अविनाश कोंडे,  धनाजी धोत्रे, निलेश कुलथे, किशोर शिंदे, रफिक नदाफ, सागर भोसले यांच्या पथकाने केली आहे. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून, सिंहगड रस्ता पोलिसांनी ब्रह्मा हॉटेल चौकामध्ये संशयित वाहनांची तपासणी सुरू केली. दरम्यान एक संशयित तरुण तिथून दुचाकी वरून जात असताना पोलिसांनी त्याला थांबण्याचा इशारा केला असता तो पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र पोलिसांनी त्याला 'धूम ' स्टाईल पकडुन  त्याची चौकशी केली असता त्याने ती दुचाकी नवले पुलाजवळून चोरी केली असल्याचे सांगितले. तसेच याआधी त्याने कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत १ दुचाकी व सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४ दुचाकी चोरल्या असल्याचेही कबूल केले. पोलिसांनी सर्व दुचाकी ताब्यात घेऊन जप्त केली आहेत.

टॅग्स :Robberyचोरीtwo wheelerटू व्हीलरPuneपुणेPoliceपोलिसArrestअटक