शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Blast : नेपाळमध्ये खरेदी केले ७ सेकंड-हँड फोन, कानपूरमधून ६ सिमकार्ड; दिल्ली स्फोटात मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 14:46 IST

Delhi Blast : दिल्लीतील लाल किल्ल्यासमोर झालेल्या स्फोटाच्या तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत.

दिल्लीतील लाल किल्ल्यासमोर झालेल्या स्फोटाच्या तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. कानपूरचं दिल्लीस्फोट प्रकरणाशी असलेलं कनेक्शन आता समोर आलं आहे. एनआयएच्या तपासात असं दिसून आलं आहे की, डॉ. परवेझ (डॉ. शाहीनचा भाऊ), हृदयरोगतज्ज्ञ डॉ. आरिफ आणि डॉ. फारूक अहमद दार हे स्फोटाच्या एक तास आधीपर्यंत डॉ. उमर (कार स्फोट घडवणारा) च्या संपर्कात होते. डॉ. शाहीन आणि डॉ. मुझम्मिल ८ नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत उमरच्या थेट संपर्कात होते. स्फोटाचं प्लॅनिंग २ ऑक्टोबरपासून सुरू झालं आणि २८ ऑक्टोबर रोजी ते अंतिम करण्यात आल्याचं देखील समोर आलं आहे.

लाल किल्ला स्फोट घडवण्यासाठी सुरू केलेल्या कारवाईत नेपाळमधून खरेदी केलेले सात सेकंड-हँड मोबाईल वापरण्यात आले होते. एकूण १७ सिम कार्ड वापरण्यात आले होते, त्यापैकी सहा कानपूरमधून खरेदी करण्यात आले होते. यापैकी दोन सिमकार्ड बेकोनगंज आयडीने ओळखले गेले होते, ज्याच्या आधारे सुरक्षा एजन्सी कारवाई करत आहेत. दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने डॉ. परवेझचा मेहुणा आणि बेकोनगंजमधील कपड्यांच्या दुकानाचा मालक उस्मान याची सहा तास चौकशी केली, परंतु अद्याप कोणतीही महत्त्वाची माहिती मिळालेली नाही.

दिल्ली स्फोटातील डॉ. शाहीनच्या कोट्यवधींच्या फंडिंगबाबत धक्कादायक खुलासा, ATS-NIA चे छापे

जैशने २० लाख पाठवले तरी डॉक्टर एकमेकांशी भिडले? दिल्ली स्फोटाबाबत धक्कादायक खुलासा

डॉ. परवेझ कानपूरला ये-जा करताना कर्नलगंज, जीएसव्हीएम मेडिकल कॉलेज, बाबूपुरवा आणि मंधाना येथील मित्रांना भेटला. ऑक्टोबरमध्ये डॉ. शाहीन कानपूरमध्ये दिसल्याचंही उघड झालं आहे. एनआयएने लाल किल्ला बॉम्बस्फोट प्रकरणातील एका आरोपीला दिल्ली न्यायालयात हजर केलं. आरोपी आमिर रशीद अलीला न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आले. त्यानंतर आमिरला १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. स्फोटात वापरलेली आय२० कार आमिर रशीद अलीच्या नावावर नोंदणीकृत होती.

दिल्ली स्फोटात खळबळजनक खुलासा; घटनास्थळी सापडली 9mm ची ३ काडतुसं , पण...

दिल्लीसह देशभरात ३२ कार वापरुन साखळी बॉम्बस्फोटचं प्लॅनिंग? दहशतवाद्यांबद्दल मोठा दावा

आमिर हा व्यवसायाने प्लंबर आहे, परंतु लाल किल्ला बॉम्बस्फोटाच्या नियोजनात सहभागी असल्याचा आरोप आहे. १० नोव्हेंबर रोजी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ स्फोटकांनी भरलेल्या एका कारचा स्फोट झाला, ज्यामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात वापरलेली कार जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा येथील डॉक्टर उमर नबी चालवत होता. उमर एका 'व्हाईट कॉलर' टेरर मॉड्यूलशी संबंधित होता ज्याचा प्रामुख्याने हरियाणाच्या फरीदाबाद येथून २,९०० किलोग्रॅम स्फोटकं सापडल्यानंतर पर्दाफाश करण्यात आला.

English
हिंदी सारांश
Web Title : Delhi Blast: Nepal phones, Kanpur SIMs link revealed in probe.

Web Summary : Delhi blast probe reveals Nepal-sourced phones, Kanpur SIM cards used. Doctors linked to the blast, planned since October. An accused remanded in custody; car was registered in his name.
टॅग्स :delhiदिल्लीBlastस्फोटcarकारMobileमोबाइलNepalनेपाळTerror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवाद