भरधाव चारचाकी वाहनाच्या धडकेने पादचाऱ्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 18:50 IST2019-07-09T18:47:39+5:302019-07-09T18:50:08+5:30

भरधाव चारचाकी मोटारीच्या धडकेने पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला.

death of person in car accident at pimpri chinchwad | भरधाव चारचाकी वाहनाच्या धडकेने पादचाऱ्याचा मृत्यू

भरधाव चारचाकी वाहनाच्या धडकेने पादचाऱ्याचा मृत्यू

पिंपरी : भरधाव चारचाकी मोटारीच्या धडकेने पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. पिंपरीतील यशवंतनगर येथे रविवारी (दि. ७) सायंकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात अज्ञात मोटारीच्या अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जून ज्ञानदेव किरदकरवे (वय ६५, रा. यशवंतनगर, पिंपरी) असे मृत्यू झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी शिवराम अर्जून किरदकरवे (वय २४, रा. यशवंतनगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी शिवराम यांचे वडील अर्जून किरदकरवे रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास यशवंतनगर येथून पायी चालत घरी जात होते. त्यावेळी एका अनोळखी चालक त्याच्या ताब्यातील चारचाकी मोटार वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून बेदरकारपणे चालवित होता. त्या अज्ञात चालकाच्या चारचाकी मोटारीची त्यांना धडक बसली. यात गंभीर  जखमी झाल्याने किरदरकरवे यांचा मृत्यू झाला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: death of person in car accident at pimpri chinchwad