कोरेगाव भीमा येथे चारचाकी वाहनांच्या धडकेत दोघांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 12:35 IST2018-12-03T12:30:54+5:302018-12-03T12:35:05+5:30

पुण्याकडून शिरूरकडे जाणाºया पुलावरून कोरेगावच्या परिसरात चारचाकी वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला

Death of both due to accident of four-wheeler at Koregaon Bhima | कोरेगाव भीमा येथे चारचाकी वाहनांच्या धडकेत दोघांचा मृत्यू 

कोरेगाव भीमा येथे चारचाकी वाहनांच्या धडकेत दोघांचा मृत्यू 

कोरेगाव भीमा : पुणे - नगर रस्त्यावरील कोेरेगाव भीमा येथे सोमवारी पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास भीमानदी पुलाच्या वळणाच्या ठिकाणी चारचाकी वाहनाच्या धडकेने दोन पादचारी तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात मोटार कारचा अक्षरश: चुराडा झाला. पुण्याकडून शिरूरकडे जाणाऱ्या पुलावरून कोरेगावच्या परिसरात चारचाकी वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने पायी जात असलेल्या दोन जणांना वाहनाची जोरदार धडक बसली. यामुळे चारचाकी वाहन महामार्गावरील संरक्षण कठडे तोडून रस्त्याखाली कोसळली.


अपघाताचा आवाज झाल्याने स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत वाहनातील युवकांना बाहेर काढले. परंतु रात्रीची वेळ असल्याने पायी जाणारे अपघातग्रस्त नागरिक लोकांना दिसले नाहीत. सोमवारी सकाळी शिक्रापूर पोलिस व स्थानिकांनी अपघातात ठार पावलेल्या लोकांना बाहेर काढले.

Web Title: Death of both due to accident of four-wheeler at Koregaon Bhima