शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

दाऊदच्या हस्तकाने केला मोठा खुलासा, नेपाळमधून भारतात पाठवत होता नकली सोनं अन् नोटा 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 7:58 PM

या काळ्याबाजारात  नेपाळमधील पाकिस्तानी दूतावास आणि पाकिस्तानी गुप्तचर संस्था, आयएसआयची मदत मिळत असे.

ठळक मुद्दे २०११ मध्ये सुमारे ५५ लाख किमतीची बनावट भारतीय चलन जप्त केल्याप्रकरणी तो फरार होता.

नेपाळ पोलिसांनी कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक अल्ताफ हुसेन अन्सारी याला नेपाळची राजधानी काठमांडू येथून अटक केली आहे. नेपाळच्या  पर्सा जिल्हा पोलिस नियंत्रण कक्षाने याबाबत माहिती दिली आहे. २०११ मध्ये सुमारे ५५ लाख किमतीची बनावट भारतीय चलन जप्त केल्याप्रकरणी तो फरार होता. पोलिसांच्या चौकशीदरम्यान त्याने बनावट नोटा आणि बनावट सोन्याच्या पुरवठ्यांच्या नेटवर्कची माहिती दिली आहे. त्याने म्हटले आहे की, या काळ्याबाजारात  नेपाळमधील पाकिस्तानी दूतावास आणि पाकिस्तानी गुप्तचर संस्था, आयएसआयची मदत मिळत असे.

नेपाळच्या पर्सा जिल्ह्यातील एसपी गंगा पंत यांनी सांगितले की, अल्ताफ हा नेपाळमधील बारा जिल्ह्यातील हरपूरचा रहिवासी आहे. त्यांनी बिहार सीमेलगत नेपाळी शहर असलेल्या वीरगंज येथे मुक्काम केला होता. तीन दिवसांपूर्वी पोलिसांनी त्याला अटक केली. गुप्त ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवून त्याची चौकशी केली जात आहे.

 

 नेपाळमध्ये भारतविरोधी घटक अधिक दृढ होत आहेत 

नेपाळमध्ये दाऊद गॅंगचे कनेक्शन जुने आहे. दरम्यान, भारत आणि चीनमध्ये तणावाचे वातावरण आहे. दरम्यान, चीन हा नेपाळमध्ये भारतविरोधी षडयंत्र रचत आहे. त्यामुळे नेपाळ आणि भारताचे संबंध बिघडत चालले आहेत. त्यामुळे नेपाळमध्ये भारतविरोधी संघटनांना बळकटी प्राप्त होत ​​आहे.

 

पोलिसांच्या चौकशीत पाकिस्तानी कट रचण्याचे रहस्य समोर आलेनेपाळ पोलिसांनी अटक केलेल्या दाऊदचा साथीदार अल्ताफ हुसेन अन्सारी याने पोलिसांच्या चौकशीत अनेक रहस्ये उघडकीस आणली आहेत. बनावट सोनं आणि बनावट नोटा देऊन भारतीय अर्थव्यवस्था नष्ट करण्याचा आयएसआयचा कटही चौकशीत उघडकीस आला आहे. अल्ताफचा संबांध युनुस अन्सारी या नेपाळी बनावट व्यवसायाशी आहे.  अहमदाबादमधील (गुजरात) संजय पटेल आणि निलेश शाक्य यांच्यासह त्यांनी भारताच्या विविध भागांत बनावट सोन्याची पुरवठा केला असल्याचेही अल्ताफने सांगितले.  बनावट नोटा आणि बनावट सोन्याच्या व्यवसायात पाकिस्तानी दूतावास आणि आयएसआयने नेपाळमध्ये मदत केली होती. हवालाचे पैसे या व्यवसायात गुंतवले गेले.युनुस अन्सारी याच्याकडे बनावट नोटा पुरविल्या जातअल्ताफ हुसेन नेपाळी तस्कर युनुस अन्सारी यांच्यासमवेत बनावट नोटा भारतात पुरवत असे. 24 मे 2019 रोजी काठमांडूच्या त्रिभुवन विमानतळावर नेपाळच्या गुप्तचर विभागाने 7.67 कोटी किंमतीच्या बनावट भारतीय चलनासह सहा जणांना पकडले होते. यामध्ये तीन पाकिस्तानी आणि तीन नेपाळ नागरिक असून त्यात एका महिलेचा समावेश आहे. पकडलेल्यांमध्ये युनूस अन्सारी याचा देखील समावेश होता, तर अल्ताफ पळून जाण्यात यशस्वी झाला.त्यानंतर बनावट सोन्याची तस्करी सुरू केलीत्यानंतर गुप्तचर विभागाच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी काही दिवस बनावट नोटांचा काळाबाजर बंद ठेवून बनावट सोन्याचा बनावट गोरख धंदा सुरू केला. दरम्यान संजय पटेल आणि निलेश शाक्य यांच्या संपर्कात आले. या तिघांनी मिळून अनेकदा मुंबई आणि गुजरातमध्ये बनावट सोन्याचा पुरवठा केला आहे.काठमांडू येथून अटक केली, आता संजय पटेलचा शोध घेत आहेनुकतेच निलेश आणि अल्ताफ हे 15 किलो बनावट सोन्याच्या पुरवठ्यासाठी काठमांडूच्या गेले होते. त्यावेळी निलेशला अटक करण्यात आली तर अल्ताफ पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून जाण्यात यशस्वी झाला, पण नेपाळच्या बारा जिल्ह्याच्या पोलिसांनी काठमांडू येथून त्याला अटक केली. आता नेपाळ पोलिस संजय पटेलचा शोध घेत आहेत. संजय पटेलला 28 जानेवारी 2014 रोजी अहमदाबादमध्ये 35 किलो सोन्यासह पकडण्यात आले. त्याच्या अटकेसाठी नेपाळ पोलिस भारतीय सुरक्षा एजन्सींच्या संपर्कात आहेत.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल

 

लज्जास्पद! चहा करण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीच्या गुप्तांगात टाकली मिरची पावडर

 

बॉलिवूड अभिनेत्यासह २३ जणांना अटक, कोरोना दहशतीखालीही गोव्यात रंगली रेव्ह पार्टी

 

पुणेरी टोळीचा कोपर खैरणेत हैदोस, पोलिसांनी पाठलाग करून पकडले आरोपी

 

पत्नीचे सहा तुकडे करून नेपाळमध्ये पळून जाण्याच्या तयारीत होता पती पण...

 

बाथरुमधील खिडकीच्या काचेनं गळा, हाताची नस कापून घेतली; खुनाच्या आरोपीचा जेलमध्येच आत्महत्येचा प्रयत्न

 

19 मांजरींचा संशयास्पद मृत्यू, विष देऊन मारल्याची शक्यता

टॅग्स :Dawood Ibrahimदाऊद इब्राहिमNepalनेपाळIndiaभारतArrestअटकGoldसोनंIndian Currencyभारतीय चलन