Crime News: घरी अन् कार्यालयात जवळच्याच लोकांपासून महिला असुरक्षित, बलात्काराच्या ९६ टक्के प्रकरणांत ओळखीच्या लोकांवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2022 10:06 AM2022-09-01T10:06:58+5:302022-09-01T10:07:30+5:30

Crime News: बलात्काराच्या ९६ टक्के प्रकरणांत कुटुंबातील सदस्य, मित्र आणि लिव्हिंग पार्टनरसह अन्य परिचित लोक असल्याचे दिसून आले आहे. बलात्काराच्या प्रकरणांत जी तीन राज्ये पहिल्या तीन क्रमांकावर आहेत, त्यात राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राचा क्रमांक आहे.

Crime News: Women are vulnerable to close people at home and office, in 96 percent cases of rape, acquaintances are accused | Crime News: घरी अन् कार्यालयात जवळच्याच लोकांपासून महिला असुरक्षित, बलात्काराच्या ९६ टक्के प्रकरणांत ओळखीच्या लोकांवर आरोप

Crime News: घरी अन् कार्यालयात जवळच्याच लोकांपासून महिला असुरक्षित, बलात्काराच्या ९६ टक्के प्रकरणांत ओळखीच्या लोकांवर आरोप

Next

नवी दिल्ली - बलात्काराच्या ९६ टक्के प्रकरणांत कुटुंबातील सदस्य, मित्र आणि लिव्हिंग पार्टनरसह अन्य परिचित लोक असल्याचे दिसून आले आहे. बलात्काराच्या प्रकरणांत जी तीन राज्ये पहिल्या तीन क्रमांकावर आहेत, त्यात राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राचा क्रमांक आहे.
पॉक्सो प्रकरणात राजस्थान, आंध्र प्रदेश आणि झारखंड ही तीन राज्ये आघाडीवर आहेत. या आकडेवारीनुसार, राजस्थानात २०२१ मध्ये बलात्काराची ६३३७ प्रकरणे दाखल झाली. यातील ६०७४ आरोपी हे परिचित होते. राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्यूरोनुसार, ५८२ प्रकरणांत कुटुंबातीलच सदस्य, १७०१ प्रकरणात मित्र, ऑनलाइन मित्र अथवा लिव्हिंग पार्टनर, तर ३७९१ प्रकरणांत आरोपी हे कुटुंबातील मित्र, शेजारी किंवा नोकरीस ठेवणारा मालक आहे. २६३ प्रकरणांत बलात्कार करणाऱ्या आरोपींची ओळख पटली नाही. 

दिल्लीतील महिला सर्वाधिक असुरक्षित
दिल्ली हे महिलांसाठी सर्वात असुरक्षित शहर आहे. एनसीआरबीच्या अहवालानुसार, २०२१ मध्ये दिल्लीत महिलांवरील अत्याचाराच्या १३,९८२ गुन्ह्यांची नोंद झाली आहे, तर देशातील एकूण १९ महानगरांमध्ये महिला अत्याचाराच्या ४३ हजार गुन्ह्यांची नोंद झाली आहे. दिल्लीनंतर मुंबईत सर्वाधिक गुन्हे दाखल झाले आहेत. बंगळुरू तिसऱ्या क्रमांकावर आहे.

पॉक्सोमध्ये टॉप तीन राज्ये (* वय वर्षांमध्ये) 
राज्य     ० ते ६     ६ ते १२     १२ ते १६     १६ ते १८    एकूण 
१. राजस्थान     १८     ६४     ४४२     ९२९     १४५३ 
२. आंध्र प्रदेश     १७     ५०     २५९     २८८     ६१४ 
३. झारखंड     ००     ०२     ६२     २३१     २९५ 


बलात्कारात टॉप तीन राज्ये (* वय वर्षांमध्ये) 
राज्य     १८ ते ३०     ३० ते ४५     ४५ ते ६०     ६०+     एकूण 
राजस्थान     ३२६५     १३०५    ३१५     ४     ४८८९ 
मध्य प्रदेश     १९४७     ८४६     १३९     १५     २९४७ 
महाराष्ट्र     १६०५     ७९५     ६९     ९     २४७८

बलात्काराच्या ९६ टक्के प्रकरणांत ओळखीच्या लोकांवर आरोप

दररोज दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार
अहवालानुसार, २०२१ मध्ये दिल्लीत दररोज दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाला. अहवालानुसार, दिल्लीत बलात्कार, अपहरण आणि महिलांवरील क्रूरतेच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. २०२१ मध्ये दिल्लीत अपहरणाचे ३,९४८, पतीकडून अत्याचाराचे ४,६७४ आणि मुलींवर बलात्काराचे ८३३ गुन्हे दाखल झाले. २०२१ मध्ये दिल्लीत हुंडाबळी मृत्यूची १३६ प्रकरणे नोंदवली गेली, जी १९ महानगरांमधील एकूण मृत्यूच्या ३६.२६ टक्के असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. देशात सायबर गुन्ह्यात तेलंगणा प्रथम क्रमांकावर आहे. या राज्यात १०३०३ प्रकरणे दाखल झाली आहेत.
 दुसऱ्या क्रमांकावर आहे उत्तर प्रदेश. या राज्यात ८८२९ प्रकरणे दाखल झाली आहेत.

Web Title: Crime News: Women are vulnerable to close people at home and office, in 96 percent cases of rape, acquaintances are accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.